पुणे -महानगरपालिकेमार्फत व्हॅक्सीन व्हिल्स या उपक्रमांतर्गत माेबाईल व्हॅनचे उदघाटन करण्यात आलेले आहे. व्हॅक्सीन ऑन व्हिल्स या उपक्रमांतर्गत जिव्हिका हेल्थकेअर प्रा.लि. व माय व्हॅक्सीन या खाजगी कंपन्यांद्वारे शहराच्या विविध भागात माेबाईल व्हॅन उपलब्ध करून देणार आहेत. पुणे महापालिकेने व्हॅक्सीन ऑन व्हिल्स हा उपक्रम केला असून उपक्रम चांगला असला तरी या विषयी पक्षनेते व काेणत्याही लाेकप्रतिनिधींना याबाबत माहिती दिलेली नाही, विश्वासात घेतलेले नाही. सदर संस्था माेबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरण करणार असून पुणे महापालिका काेणत्या अधिनियमाखाली त्यांना लस उपलब्ध करून देणार आहे. जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांवर अविश्वास दाखविणारे प्रशासन खाजगी व चॅरिटेबल संस्थांवर विश्वास दाखवते हा कारभार आंधळ दळतय … असा आहे म्हटले वावगे ठरणार नाही. पुणे महानगरपालिकेतील कारभार सर्व लाेकप्रतिनिधींना गृहीत धरूनच चालू आहे असे सत्ताधारी समजत असून आता प्रशासनही त्याप्रमाणेच कारभार करत आहे याचा खेद सर्व पक्षीय लाेकप्रतिनिधींना करणेशिवाय गत्यंतर नाही. याविषयी खुलासा करावा अशी मागणी आयुक्त, यांचेकडे आबा बागूलांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेच्या विविध लसीकरण केंद्रात लाेकप्रतिनिधी नागरिकांना सहकार्य करतात, त्यांच्यावर कलम 353 नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी आम्ही पुणेकरांना लस गतीने मिळाव्यात व काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी 353 नाही तर जन्मठेप केली तरी मागे हटणार नाही असे महापालिका आयुक्तांना कळविले हाेते. एक नगरसेवक एक लसीकरण केंद्र अशी घाेषणा आजच आयुक्तांनी केली असे असताना या 5 व्हॅन काेणाच्या अखत्यारित असणार. काेणाच्या मान्यतेने का कारभार हाेणार असाही प्रश्न आबा बागूलांनी विचारला.
लसीकरण केंद्रावर नागरिकांना सहकार्य करणारे लाेकप्रतिनिधी हे अरेरावी करतात, घाेळ घालतात, दादागिरी करतात असे आराेप हाेत असताना सीएसआर अंतर्गत जिव्हिका हेल्थकेअर प्रा.लि. व माय व्हॅक्सीन अशा संस्थांच्या कामावर काेणाचे नियंत्रण असेल याबाबत काेणतीही माहिती दिली जात नाही.
बागूल म्हणाले की, मार्च 2020 पासून काेराेनाच्या पार्श्वभूमी प्रशासनाबराेबर सर्वच लाेकप्रतिनिधींनी काम केले असून प्रशासनाच्या मागे ठामपणे पाठीशी राहिलेले आहे. असे असताना पक्षनेते, स्थायी समिती व मुख्य सभा यांना काेणतीही माहिती न देता असे उपक्रम राबविणे व खाजगी संस्थांच्या ताब्यात लस देणे कितपत याेग्य असा प्रश्न विचारला आहे.

