ग्राहक कल्‍याण साधले जावे- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

Date:

पुणे-शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्‍य यांच्‍या संवाद आणि समन्‍वयातून ग्राहक कल्‍याण साधले जावे, अशी अपेक्षा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्‍यक्‍त केली.  पुणे जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदेच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड उपस्थित होते.जिल्‍हाधिकारी  राम म्‍हणाले, प्रत्‍येक व्‍यक्‍ती ग्राहक असतो, त्‍यामुळे  शासकीय अधिका-यांनीही आपली जबाबदारी पार पाडतांना आपणही ग्राहकाच्‍या संज्ञेत येतो, हे लक्षात घ्‍यावे. बैठकीत पुरवठा विभाग, आरोग्‍य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभिाग, महावितरण, अन्‍न व औषध विभाग आदी विभागांच्‍या प्रश्‍नांवर चर्चा झाली. जिल्‍ह्यातील रस्‍त्‍यावरील गतीरोधकांबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार व गतीरोधकांसाठी असलेल्‍या निकषानुसार कार्यवाही व्‍हावी, 108 क्रमांकाच्‍या रुग्णवाहिकेबाबत दिलेल्‍या निर्देशांनुसार अंमलबजावणी होते की नाही, याचा आढावा घ्‍यावा, धर्मादाय आयुक्‍तांच्‍या आदेशानुसार खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये आर्थिकदृष्‍टया दुर्बल घटकांसाठी राखीव जागा ठेवण्‍याबाबत पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्‍हाधिकारी राम यांनी दिले. यावेळी शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्‍य उपस्थित होते.

0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कुदळवाडी येथील आगीवर अग्निशमन विभागाचे यशस्वी नियंत्रण!

पुणे-चिखली येथील कुदळवाडी परिसरात पहाटे लागलेल्या आगीची माहिती मिळताच...

टाटा म्युच्युअल फंडने लाँच केला मल्टी-सेक्टर पॅसिव्ह एफओएफ

गुंतवणूकदारांना मिळणार बाजारातील वेगवेगळ्या उद्योगांमधील प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचे फायदे मुंबई: टाटा एसेट मॅनेजमेंटने आज 'टाटा मल्टी-सेक्टर पॅसिव्ह एफओएफ' सुरु केल्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड 'फंड ऑफ फंड' स्कीम आहे, जी वेगवेगळ्या उद्योगांच्या पॅसिव्ह इक्विटी म्युच्युअल फंड्सच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करते. पॅसिव्ह सेक्टोरल फंड्स आणि ईटीएफमध्ये समजूतदारपणे बदल करून दीर्घकाळात गुंतवणूकदारांचा पैसा वाढवणे हा या स्कीमचा मुख्य उद्देश आहे. नवीन फंड ऑफर २२ जून २०२६ रोजी खुली होईल आणि ६ जुलै २०२६ रोजी बंद होईल. शेअर बाजाराने हे दाखवून दिले आहे कि बाजारात नेहमीच एकच उद्योग पहिल्या क्रमांकावर राहत नाही, तर त्यामध्ये सातत्याने बदल होत असतो आणि यावर देश-विदेशातील आर्थिक बदलांचा थेट परिणाम होतो. वेगवेगळ्या वेळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल्स, पीएसयू बँका, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्झम्पशन यांसारखे उद्योग मार्केट लीडर म्हणून समोर आले आहेत. बाजारातील हे बदल योग्य वेळी ओळखणे गुंतवणूकदारांसाठी नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे. टाटा मल्टी-सेक्टर पॅसिव्ह एफओएफचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांची हीच अडचण दूर करणे आहे. यासाठी फंड मॅनेजर्स त्यांच्या मूल्यांकनानुसार वेगवेगळे मार्ग अवलंबतात. यामध्ये 'मोमेंटम-आधारित अलोकेशन फ्रेमवर्क' सारख्या रणनीतींचा वापर केला जातो. या माध्यमातून ही योजना वेगवेगळ्या सेक्टर इंडेक्स फंड्स आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करते. हे धोरण उद्योगांच्या अलीकडील कामगिरीची तपासणी करते. तसेच, ती बाजारातील चढ-उतारांनुसार परतावा ॲडजस्ट देखील करते. ज्या सेक्टर्समध्ये मजबूत आणि स्थिर कल दिसून येत आहे, त्यांना प्राधान्य देणे हा यामागचा उद्देश आहे. मात्र, एखाद्या सेक्टरची भूतकाळातील तेजी ही भविष्यातील चांगल्या कामगिरीची हमी असू शकत नाही. पोर्टफोलिओमध्ये कोणत्या उद्योगाला किती वाटा मिळेल, हे काही महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये त्या सेक्टरचे भविष्य, त्याच्या तेजीची वैशिष्ट्ये आणि देश-विदेशातील मोठ्या आर्थिक घडामोडी यांचा समावेश होतो. ज्या सेक्टर्समध्ये सर्वाधिक मजबूती आणि तेजी दिसते, त्यांना पोर्टफोलिओमध्ये जास्त वाटा दिला जातो. या लाँच प्रसंगी टाटा एसेट मॅनेजमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर आनंद वरदराजन म्हणाले: "वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करणे हे संपत्ती निर्माण करण्याचे एक अत्यंत शक्तिशाली माध्यम आहे. परंतु, यामध्ये योग्य वेळी योग्य सेक्टर निवडणे खूप कठीण असते. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे सेक्टर्स काळाबरोबर बदलत राहतात. या आर्थिक चक्रांचा पाठलाग करण्याच्या नादात गुंतवणूकदार अनेकदा भावनांच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेतात. तसेच, वारंवार गुंतवणूक बदलल्यामुळे कराचा बोजाही वाढतो.टाटा मल्टी-सेक्टर पॅसिव्ह एफओएफ गुंतवणूकदारांना एक शिस्तबद्ध आणि नियमांवर आधारित सिस्टीम प्रदान करते. ही सिस्टीम केवळ अंदाजावर काम करण्याची सवय संपवते. हे कमी खर्चाच्या पॅसिव्ह टूल्सच्या माध्यमातून आपोआप सर्वात मजबूत सेक्टर्सकडे वळते. यासोबतच, बाजारातील अचानक होणारे मोठे बदल किंवा महत्त्वाच्या घडामोडींचा फायदा घेण्यासाठी यामध्ये फंड मॅनेजरच्या अनुभवाचा आणि सूझबुझचा वापरही समाविष्ट आहे.वेगवेगळ्या सेक्टर्समधील गुंतवणूक, वेळेवर पोर्टफोलिओचे संतुलन राखणे आणि आमच्या इन्व्हेस्टमेंट टीमची बारीक नजर, या सर्वांच्या मदतीने गुंतवणूकदारांना बाजारातील बदलत्या ट्रेंड्समधून उत्तम नफा मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे." हा फंड त्याच्या 'फंड ऑफ फंड' स्ट्रक्चर आणि कमी खर्चाच्या पॅसिव्ह मॉडेलचा मेळ घालतो. स्वतःहून वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक बदलताना गुंतवणूकदारांचा होणारा वेळेचा अपव्यय आणि भीती किंवा घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेण्याची सवय दूर करणे, हा या फंडचा उद्देश आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये  इन-बिल्ट डायव्हर्सिफिकेशन: हा फंड अनेक वेगवेगळ्या सेक्टर इंडेक्स फंड्स आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करून तुमचा जोखीम कमी करतो. करामध्ये बचत: फंडच्या आत होणाऱ्या गुंतवणुकीच्या बदलांवर गुंतवणूकदारांना कोणताही कॅपिटल गेन्स टॅक्स (भांडवली नफा कर) द्यावा लागत नाही. किमान गुंतवणूक रक्कम: तुम्ही किमान ₹५,००० पासून गुंतवणूक सुरू करू शकता. यानंतर ₹१ च्या पटीत कितीही गुंतवणूक करता येईल. लोड स्ट्रक्चर: यामध्ये कोणताही एंट्री लोड लागणार नाही. युनिट्स मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत पैसे काढल्यास ०.५०% एक्झिट लोड लागेल. ३० दिवसांनंतर पैसे काढल्यास हा लोड पूर्णपणे शून्य असेल. बेंचमार्क आणि जोखीम: या फंडचा बेंचमार्क 'Nifty 500 TRI' हा आहे. या योजनेचा आणि बेंचमार्कचा रिस्कोमीटर 'व्हेरी हाय' (अत्यंत उच्च जोखीम) या वर्गात येतो.

द योगा इन्स्टिट्यूट, सांताक्रूझ (मुंबई) तर्फे देशव्यापी उपक्रमांसह 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

मुंबई- जगातील सर्वात जुने संघटित योग केंद्र आणि गेल्या 107 वर्षांहून अधिक काळ सर्वांगीण आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या मुंबईतील सांताक्रूझ येथील द योगा इन्स्टिट्यूट (TYI) ने 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) भव्य प्रमाणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. यावर्षीच्या “निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण वार्धक्यासाठी योग” या संकल्पनेशी सुसंगत राहून संस्थेने जागतिक स्तरावर शासकीय संस्था, संरक्षण आस्थापना, कॉर्पोरेट कार्यालये, शैक्षणिक परिसर, विमानतळे तसेच डिजिटल माध्यमांद्वारे शेकडो कार्यक्रमांचे आयोजन करत लाखो लोकांना यात सहभागी करून घेतले. मुंबईपासून चेन्नईपर्यंत आणि जयपूरपासून भुवनेश्वरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांनी विविध वयोगट आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये निरोगी वार्धक्याचा संदेश पोहोचवला. प्रतिबंधात्मक उपचार असलेली आरोग्यसेवा, लवचिकता आणि सजग जीवनशैली यामध्ये योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. हंसाजी योगेंद्र म्हणाल्या, “वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु शारीरिक व मानसिक ऱ्हास होणे ही गोष्ट स्वाभाविक नाही. योगाच्या माध्यमातून आपण शरीराची ताकद, मनाची स्पष्टता, भावनांमधील संतुलन आणि अंतःकरणातील आनंद टिकवून ठेवू शकतो. निरोगी वार्धक्य म्हणजे केवळ आयुष्यात वर्षांची भर घालणे नव्हे; तर प्रत्येक वर्ष अधिक उत्साही, स्वावलंबी आणि उद्देशपूर्ण बनवणे आहे.” 10 कोटींहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारी, 100,000 पेक्षा अधिक प्रमाणपत्रधारक सर्टिफाईड योग शिक्षक घडवणारी आणि योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित झालेली द योगा इन्स्टिट्यूट आजही जगभरात अस्सल आणि विश्वासार्ह योग शिक्षणाचा प्रसार करत असून व्यक्तींना अधिक निरोगी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनवत आहे. योग दिनासाठीच्या कार्यक्रमाची प्रमुख ठळक वैशिष्ट्ये 3 दिवसीय ऑनलाइन योग महोत्सव (19–21 जून): जगभरातील सहभागींच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह आयोजित या महोत्सवामध्ये इस्कॉनचे स्वामी गौरांग दास जी, आहारतज्ज्ञ रायन फर्नांडो, सर्वांगीण आरोग्यतज्ज्ञ मिकी मेहता तसेच द योगा इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शिक्षक यांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. ध्यानधारणा, पोषक आहार, तणाव व्यवस्थापन आणि ध्वनी उपचार (साउंड हीलिंग) यांच्या माध्यमातून निरोगी वार्धक्याकडे जाणाऱ्या व्यावहारिक मार्गांचा सहभागींनी अभ्यास केला. बांद्रा रिक्लेमेशन येथील भव्य योग सत्र: द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हंसाजी योगेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिकांनी भव्य सामुदायिक योग सत्रात सहभाग घेतला. या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री श्री. आशिष शेलार तसेच आरोग्यस्वास्थ्य जागरूकता प्रसारक टेरेन्स लुईस उपस्थित होते. योग बाय द बे (मरीन ड्राइव्ह): द टाइम्स ऑफ इंडिया, शायना एनसी आणि मिकी मेहता यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या सूर्योदयाच्या सकाळच्या योग सत्रात हजारो लोक सहभागी झाले. श्रीमती अनुप्रिया पटेल, श्री. जितीन प्रसाद आणि श्री. जयंत चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्याविषयी देशाची वाढती बांधिलकी या उपस्थितीतून स्पष्टपणे दिसून आली. संस्थात्मक, शैक्षणिक आणि कॉर्पोरेट स्तरावरील पोहोच संस्थेने विविध क्षेत्रांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करून आपली पोहोच अधिक व्यापक केली: सार्वजनिक आणि संरक्षण क्षेत्र: मानसिक स्पष्टता आणि शारीरिक आरोग्यस्वास्थ्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मंत्रालय, सीसीआरवायएन, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (T1 आणि T2), सीआयएसएफ, भारतीय सेना आणि भारतीय वायुदल येथे योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक संस्था: मिठीबाई, एनएमआयएमएस, चेतना आणि ठाकूर कॉलेज यांसह बीएमसीच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना आत्मविकासासाठी योगाचे महत्त्व समजावून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कॉर्पोरेट आरोग्यस्वास्थ्य उपक्रम: ओएनजीसी, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, माझगाव डॉक आणि टाटा केअर यांच्यासाठी विशेष आरोग्यविषयक योग उपक्रम आयोजित करण्यात आले. तसेच मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्स यांच्या सहकार्याने देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ), माहीम, मुंबई सेंट्रल आणि विले पार्ले येथील टपाल कार्यालयांमध्ये आयोजित सत्रांद्वारे तसेच चंडोक ग्रुप यांच्या सहकार्याने बोरिवली, अंधेरी आणि चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांपर्यंत योग पोहोचविण्याचे कार्य अधिक बळकट करण्यात आले. गेल्या 107 वर्षांहून अधिक काळ द योगा इन्स्टिट्यूट अस्सल आणि विश्वासार्ह योग शिक्षण आणि सामुदायिक आरोग्यस्वास्थ्य संवर्धनाच्या क्षेत्रात आघाडीवर राहिली आहे. 10 कोटींहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श करत, 100,000 पेक्षा अधिक प्रमाणपत्रधारक योग शिक्षकांचे प्रशिक्षण, 1,000 हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन आणि जगभरातील 10 दशलक्षांहून अधिक सदस्यांचा डिजिटल समुदाय निर्माण करून संस्थेने योग सर्व स्तरांतील लोकांसाठी सुलभ करण्यामध्ये परिवर्तनकारी भूमिका बजावली आहे. योग क्षेत्रातील संस्थेच्या या असामान्य योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या “योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पंतप्रधान पुरस्कार” या सन्मानाने संस्थेला गौरविण्यात आले आहे.