“लोकराज्य” मासिक हे ज्ञानाचे भांडार- उप प्राचार्य डॉ. शिवाजी साठे

Date:

बारामती : स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य हे मासिक अत्यंत उपयुक्त असून ते ज्ञानाचे भांडार असल्याचे प्रतिपादन तुळजाराम चतुरचंद कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. शिवाजी साठे यांनी आज केले.

येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहात “लोकराज्य वाचक मेळावा” कार्यक्रमात डॉ. शिवाजी साठे बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती अधिकारी संग्राम इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, प्रा. विलास कर्डीले उपस्थित होते.

डॉ. शिवाजी साठे म्हणाले, वाचनाने माणूस समृध्द होतो. शासनाचे मुखपत्र असणारे लोकराज्य हे मासिक दर्जेदार असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ज्ञानाचे आकलन होण्यासाठी वाचन महत्वाचे असते, ही ज्ञानाची भूक भागविण्याचे काम लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून होते.

श्री. मोहन राठोड म्हणाले, लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र आहे. लोकराज्यच्या माध्यमातून शासनाचे निर्णय, विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक दिशादर्शकाची भूमिका निभावते. देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी लोकराज्य मासिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हाच लोकराज्य वाचक मेळाव्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. राजेंद्र सरग म्हणाले, लोकराज्य मासिकाला सत्तर वर्षांची परंपरा आहे. अनेक दिग्गज लेखकांचे विविध विषयांवरील लेख लोकराज्यच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचत असतात. लोकराज्य विशेषांकांच्या माध्यमातून वाचकांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावते.

श्री. ज्ञानेश भुकेले यांनी लोकराज्य वाचक मेळाव्याची संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सारिका कळसकर, गीता वरकुटे यांनी केले. आभार संग्राम इंगळे यांनी मानले.

यावेळी प्रा.एस. आर. काळे, प्रा. जयेंद्र राणे, प्रा. रणजीत पंडीत, प्रा. जयप्रकाश पाटील, डॉ. राऊत, प्रा. विनायक लष्कर, राजश्री आगम, प्रा. संजय भिसे, उप माहिती कार्यालयाचे प्र.माहिती सहायक विलास कसबे, विशाल कार्लेकर, सुर्यकांत कासार, नरेंद्र वासनिक, अमित खडतरे, भिमराव गायकवाड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...