पुणे : आवेष्टित वस्तूंची छापील किमतीपेक्षा अधिक दराने होणाऱ्या विक्रीला आळा घालण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्थानिक पातळीवर लोकसहभागातून दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती वैध मापन शास्त्र पुणे उपविभागाचे उपनियंत्रक ध. ल. कोवे यांनी दिली आहे.
वैध मापन शास्त्र नियम २०११, मधील तरतुदीनुसार आवेष्टित स्वरुपाच्या वस्तू छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करणे अपराध आहे. वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे आवेष्टित स्वरुपाच्या दूध, बाटलीबंद पाणी, शितपेय आदी वस्तूंची छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात.वैध मापन शास्त्र निरीक्षकास अशा अनुचित व्यापाऱ्यांच्या सर्व ठिकाणी व समुचित वेळेत नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. परिणामी ग्राहकांची फसवणुक होवून त्यांचे आर्थिक शोषण होते. या गैर प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून पालकमंत्री गिरीष बापट यांच्या शिफारशीनुसार या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
पुणे महानगरपालिका पातळीवरील दक्षता समितीमध्ये पुढील सदस्याचा समावेश आहे. बाळासाहेब किसनराव पवार-८४२१३०००६०, छगन लक्ष्मण बुलाखे- ९३७०५७१४५९, सुधाकर गोरोबा राऊत- ९९२१५२८१७६, संदिप यादवराव सणस- ९८९०८९०८३९, राजु धेनु चव्हाण- ९६५७१२१८१८, राजेंद्र दामोदर शिंदे- ९८२२००९६६०. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पातळीवर पुढील सदस्यांचा समावेश आहे. संदिप श्रीरंग सुर्यवंशी- ९३७२३७२००७, त्रिंबक दिनकर सोनार- ९८५००५९२१७, संतोष गुलाबराव जाधव- ९२२५६१०६०५, प्रसेन प्रभाकर अष्टेकर- ९८२२६७७१०१, बापु मधुकर वाघमारे, दिनेश लालचंद यादव- ९१७५४८३०३०, भाऊसाहेब दामुआण्णा लांडगे- ९८९०९४२९४४ तर द.गं.महाजन, सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे जिल्हा हे दोन्ही समितीचे अध्यक्ष आहेत. सु.ह.चाटे, सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे विभाग हे पुणे महानगर समितीचे सदस्य सचिव असून श्रीमती सीमा.सु.बैस सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे विभाग या पिंपरी-चिंचवड दक्षता समितीच्या सदस्या सचिव आहेत.