पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,पुणे आयोजित “आंबा महोत्सवाचे” उदघाटन आज सकाळी 10 वाजता सहकार व पणनमंत्री यांच्या हस्ते पणन विभागाचे मुख्यालय येथे संपन्न झाले.
या महोत्सवाचे आयोजन पणन मंडळाच्या मुख्यालयाच्या शेजारील आवारात करण्यात आले आहे. यामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण 22 स्टॉल्सचा समावेश आहे. ग्राहक आणि शेतकरी यांना थेट खरेदी विक्री करता येणार असल्याने दोघांचाही लाभ होणार आहे. यावेळी सुभाष देशमुख यांनी सर्व स्टॉल्सला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. आंबा उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्रीची व्यवस्था झाल्यामुळे आडते, मध्यस्थ,दलाल विरहीत विक्री करता येणार असल्यामुळे उत्पन्नात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या हंगामामध्ये किमान 1 हजार मे. टन आंब्याची ग्राहकांना थेट विक्री करण्याचे कृषी व पणन मंडळाचे उद्दिष्ट आहे,अशी माहिती पणनचे कार्यकारी संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल यांनी दिली.
रामकृष्ण सभागृह,पिंपरी-चिंचवड येथे लवकरच होणार असून,शेतकरी आठवडी बाजारात तसेच 1 ते 10 एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे हा महोत्सव होणार आहे. मुंबई ,नवी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील महत्वाच्या शहरात,तसेच बाहेरील राज्यात देखील लवकरच आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.या उदघाटनप्रसंगी पणन संचालक सुनील पवार,पणनचे सर्व कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.