पुणे: राज्य निवडणुक आयोगाने आचारसंहितेवर देखरेख ठेवण्यासाठी “कॉप” “COP” (Citizen on portal) हे ॲप तयार केले आहे. निवडणुक प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालणे हा या ॲप निर्मितीचा मुख्य उद्देश आहे. या ॲपच्या माध्यमातुन सुज्ञ जनता उमेदवाराच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू शकतात आणि गैरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह त्याची तात्काळ तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदविता येईल. तसेच या माध्यमातून उमेदवाराच्या आचार संहिता भंगाच्या तक्रारी सुलभपणे निवडणूक आयोगाकडे दाखल करु शकतील.
या ॲपद्वारे तक्रार केलेल्या तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवण्यात येईल व तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल देखील तक्रारदारास ॲपमार्फत दिसून येईल. तक्रारदार पुढीलप्रमाणे छायाचित्रासह तक्रार नोंदवू शकतो. पैसे, भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटपमद्दे वाटप, अग्निशस्त्र बंदुक, पिस्तुल, रिव्हॉलवर, घोषणा व जाहिराती, बॅनर, फलक, पोस्टर व होंर्डिंग, सरकारी गाड्यांचा वापर, इलेक्ट्रॉनिक मिडीया, पेड न्यूज, सोशल मिडीया, प्रचार रॅली, मिरवणुका, सभा, प्रार्थना स्थळाचा वापर, प्राण्यांचा वापर, लहान मुलांचा वापर, भुमी पुजन, उद्घाटन समारंभ, ध्वनीक्षेपण गैरवापर, प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीमध्ये वास्तव करणे, मतदानाचे दिवशी वाहनांचा वापर याप्रकारच्या तक्रारी निवडणूक आयोगाला पाठविता येतील. सदरचे ॲप http://cramat.com/s/cuowrp या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.