पुणे-
सागर शिंदे (पत्रकार)आणि मोहिनी भोसले या जोडीने समतभूमी (म.फुले वाडा) येथे आंतरजातीय विवाह सत्यशोधक विवाह केंद्राच्या माध्यमातूनसंपन्न झाला .
आंतरजातीय लग्न असल्यामुळे दोन्ही कुटुंबीयांचा सुरुवातीला या विवाहास विरोध होता. पण, दोघांनीही दोन्हीकडील मंडळींच्या घरच्यांची समजूत काढत कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह २ जुलै २०१८ रोजी दुपारी १ वाजता संपन्न झाला..
डॉ बाबा आढाव व सचिन बगाडे यांनी नव दाम्पत्यास शपथ दिली तर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा जोतीराव फुले यांचे सत्याचे अखंड गायनही केले हा विवाह सत्यशोधक विवाह केंद्राच्या प्रमुख प्रा प्रतिमा परदेशी यांनी लावला. सहजीवनाचे प्रतीक असणारे आपट्याची पान वराने वधूला दिले. हि आदिवासी लग्नातील पद्धती सत्यशोधक विवाहात अवलंबिली जाऊ लागल्याचे विधिकार्त्या प्रतिमा परदेशी यांनी सांगितले. मंगल ओवी, सहजीवनाची शपथ असा साधा विधीने हा विवाह पार पडला. डॉ.आढाव यांनी वधु वर यांना संविधानाचे पुस्तक, रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमा भेट दिली.
यावेळी डॉ.बाबा आढाव, यांच्या सह किशोर ढमाले, अंकल सोनवणे, सचिन बगाडे, आकाश ढोक यांच्यासह पुरोगामी चळवळीतील मान्यवर आणि अनेक पत्रकार उपस्थित होते