
पुणे- मागील वर्षी पर्यावरण पुरक एक नविन उपक्रम आपल्या धनकवडी येथील लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे सुरु केला तो म्हणजे ई_वेस्ट (कचरा) संकलन केंद्र.खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणारी स्वच्छ संस्था व पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या ई-वेस्ट संकलन केंद्रामध्ये वर्षपुर्तीला एक टन कचरा संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण झाले. पुणे शहरातील एकमेव असे गेल्या वर्षभरापासून हे केंद्र अविश्रांतपणे रात्रंदिवस २४/७ सुरु आहे आणि यामध्ये आजपर्यंत १२०० किलो ई-वेस्ट गोळा झाले आहे.याबाबतचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वच्छ संस्थेने प्रमाणपत्र दिले. खासदार सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रमाणपत्र देण्यात आले .महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक विशाल तांबे,नगरसेविका अश्विनी भागवत,बाळू धनकवडे यावेळी उपस्थित होते .
‘हा उपक्रम एक उदाहरण ठरत असून कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणाच्याही दृष्टीने तो महत्त्वाचा देखील आहे. यासारखे उपक्रम शहरात जागोजागी उभे राहून ते उत्तमरित्या चालू लागले तर शहराची ई-वेस्ट व्यवस्थापनाची समस्या पुर्णतः दूर होऊ शकेल.असे यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले .