Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लवकरच रिक्षा भाडेवाडीचा निर्णय , रिक्षा चालकांनी सौजन्यपूर्ण सेवा द्यावी : बाबा कांबळे

Date:

प्रवाशांनी सहकार्य करण्याचे बाबा कांबळे यांचे आवाहन

पिंपरी / प्रतिनिधी

रिक्षा चालकांसाठी होऊ घातलेल्या मीटर भाडेवाडीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे. महागाई वाढल्यामुळे ही वाढ होणे गरजेचे होते. प्रवाशांनी देखील रिक्षा चालकांना सहकार्य करावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की,
रिक्षा मीटरमध्ये भाडेवाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा संघटना, ग्राहक व प्रवासी संघटना यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आता पहिल्या किलो मीटरसाठी २७ रूपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटर पाठीमागे १८ रूपये भाडेवाढ निश्चित करण्यात आली आहे. लवकरच आरटीओ कमिटी मध्ये हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

सीएनजीच्या दरामध्ये व महागाईच्या दरामध्ये सतत वाढ होत आहे. यामुळे खटवा कमिटीच्या सूत्रानुसार ही भाडेवाढ देण्यात आली आहे.
या भाडेवाडीचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी स्वागत केले आहे. रिक्षा भाडेवाडीने नागरिकांच्या खिशाला कात्री बसेल याची जाण रिक्षा चालक मालकांना आहे. मात्र वाढत्या महागाईचा रिक्षा चालकांना किती फटका सहन करावा लागत आहे याचा देखील सहानुभूतीपूर्वक नागरिकांनी विचार करावा, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे. विविध कर्जाचे डोंगर रिक्षा चालकांवर झाले आहेत. ते कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून रखडलेली भाडेवाढ होणे गरजेचे होते. नागरिकांनी देखील समजून घेऊन सहकार्य करावे असे, आवाहन बाबा कांबळे यांनी केले. तसेच रिक्षा चालकांनी ग्राहकांना योग्य सेवा देऊन गैरवर्तन करू न करण्याचे देखील आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

रिक्षा चालक मालकांसाठी होऊ घातलेली रिक्षा मिटर भाडे वाढ ही ऐतिहासिक आहे. हे रिक्षा चालक मालकाने लक्षात घ्यावे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक मालकांसाठी आनंदाची बाब आहे.

भाडेवाढ मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या व आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या व सर्व रिक्षा चालक मालकांचे या वेळी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...