पुणे-परिस्थितीचा रेटा एवढा वाढला आहे कि, आंबेडकरवादी सर्व शक्तींना संकटाशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही असे प्रतिपादन दलित पँथरच्या सर्वेसर्वा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी येथे केले . गंज पेठमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित दलित पँथरच्या ४५ व्या वर्धापन दिन सोहळ्यास त्या अध्यक्षस्थानीउपस्थित होत्या . यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले .आणि आंबेडकरवाद्यांना अहंकार सोडण्याचेही आवाहन केले . (पहा नेमके ढसाळ काय म्हणाल्या व्हिडीओ)
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे , दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम , कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद , पुणे शहर अध्यक्ष गणेश रेड्डी , कवी बादशहा सय्यद ,अल्पसंख्यांक अध्यक्ष इलियास शेख , नगरसेवक सुनिल कांबळे , बाळासाहेब पडवळ , सुरेश केदारे , अनिल हातागळे ,राहुल डंबाळे , शंकर तडाखे , महाराष्ट्र राज्याचे वनप्रमुख जीतसिंग आदी मान्यवर उपस्थित होते .
. दलित पँथरच्या सर्वेसर्वा मल्लिका नामदेव ढसाळ यांनीसांगितले कि , दलित पँथरच्या नावातच वजन आहे . पँथर म्हणल्यानंतर भले भले वचकतात पँथरच्या अनेक शाखा तयार झाल्या मात्र खोड एकच आहे . पूर्ण भारतात प्रत्येक राज्यात दलित पँथर असावी . जेणेकरून दलितांवर अन्याय करणाऱ्याना वचक बसेल . दलित पँथरचे ध्येय दलित शोषितांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे आहे . अन्यायाच्या प्रतिकारासाठी तुमच्यातून नामदेव ढसाळ निर्माण होतील . यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळांनी आपल्या चळवळीच्या तसेच लेखणीच्या माध्यमातून दलित पँथरमुळे जनतेला दलित शोषितांना न्याय मिळवून दिला आहे . अन्याय विरुध्द काम करण्याचा आत्मविश्वास दलित पँथरमुळे निर्माण झाला आहे . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षातच पँथरने चळवळीद्वारे संविधानाच्या कायद्याचे हक्क नागरिकांना मिळवून दिले . पुणे शहराच्या ऐतिहासिक भूमीतून पँथर चळवळ उभी राहिली . यावेळी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले कि , अन्याय होणाऱ्याविरुद्ध पँथरचे कार्यकर्ते जाब विचारायचे , गोरगरीब वंचित घटकासाठी दलित पँथरने कार्यरत राहिली . गायला मारायचे नाही माणसाला मारायचे या प्रवृत्तीविरुध्द लढण्याची ताकद एक पँथरच आणू शकतो . लाठयाकाठ्याची चळवळ सामाजिक माध्यमामध्येच चाललेली आहे . त्यासाठी हि चळवळ एका व्यासपीठावर आणणे गरजेचे आहे . या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले .

