Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘राघू पिंजऱ्यात आला’ या गाण्यावर थिरकरली डेझी

Date:

दगडी चाळ 2′ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे आपल्या समोर आले. मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

‘राघू पिंजऱ्यात आला’ असे या गाण्याचे बोल असून हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाह हिने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे हिचा आवाज लाभला आहे. तर अवघ्या बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणाऱ्या आदिल शेख यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. गाण्याचे भन्नाट बोल, डेझीचा सिझलिंग परफॉर्मन्स आणि घायाळ करणाऱ्या तिच्या अदा या सगळ्यामुळे हे गाणे ग्लॅमरस बनले आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ येत्या 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पहा गाणं…

या गाण्याबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, “जेव्हा या गाण्याचा आम्ही या चित्रपटात समावेश करण्याचे ठरवले, तेव्हा सर्वात आधी माझ्यासमोर डेझी शाहचा चेहरा आला. याबाबत आम्ही तिला विचारणा केली आणि तिनेही त्वरित होकार दिला. हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीने मराठी पडद्यावर काम करायला इतक्या लगेच होकार देणे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गाण्याची टीमच इतकी अफलातून आहे की, हे गाणे, डेझीचे नृत्य प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.”

संगीतकार अमितराज या गाण्याबद्दल सांगतात, “क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल इतके उत्स्फूर्त लिहिले की, त्याला संगीतही त्याच ताकदीचे लागणार होते. मुग्धानेही या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे आणि मात्र त्यात अधिक रंगत आणली आहे ती डेझीच्या बहारदार नृत्याने. हे गाणे ऐकताना कोणाचेच पाय जमिनीवर स्थिर राहू शकत नाहीत. सगळ्यांना ठेका धरायला लावणारे हे गाणे आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...