Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

 भारतरत्न लता मंगेशकर यांचा सुवर्णांकित पुतळा बद्रिनाथधाम येथील सरस्वती मंदिरात स्थापन करणार

Date:

पुणे, दि.८ ऑगस्ट – पुणे येथील विश्वशांती केंद्र (आळंदी-देहू) व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे श्री बद्रिनाथधाम, उत्तराखंड जवळील माणा ह्या गावी श्री सरस्वती नदीच्या उगमाजवळ, नरनारायण पर्वताच्या कुशीत, नुकत्याच उभारलेल्या श्री सरस्वती मंदिरात, गानसरस्वती विश्वगानसम्राज्ञी नादब्रह्मयोगिनी भारतरत्न लता मंगेशकर- दीदी यांचा ब्राँझचा सुवर्णांकित पुतळा स्थापित करण्यात येणार आहे.
हा पुतळा, पुणे येथील विश्वराजबागच्या प्रांगणातून एका हृदयस्पर्शी अशा स्वरसुमनांजली अर्पण करणार्‍या अभिवादनपर समारंभाद्वारे, तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज ह्यांची ज्ञानभूमी असलेल्या पुणे येथून, परमपवित्र बद्रिनाथ धामाच्या सान्निध्यात, महर्षि वेदव्यास यांच्या ज्ञानभूमीत, सीमांत गाव माणा येथील केशवप्रयाग येथे, क्रांतिदिन, म्हणजेच मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वा. विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथील श्री विश्वदर्शन देवता मंदिरातून रवाना करण्यात येणार आहे.  
या श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान धामामध्ये विश्वगानसम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांचा पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या पाठवणीप्रसंगी आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, गायक पं. उपेन्द्र भट, श्री राहुल देशपांडे, गायिका श्रीमती साधना सरगम, श्री.आदिनाथ मंगेशकर, गायक रविंद्र यादव सहभागी होऊन स्वरसुमनांजली वाहणार  आहेत. त्याचवेळी, कवयित्री तत्वदर्शी प्रज्ञावंत वै. उर्मिला विश्वनाथ कराड यांनी शब्दबद्ध केलेल्या अंतिम कवितेचे सादरीकरण संगीतकार निखील महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गायिका श्रृती देशपांडे करणार आहेत.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार, ज्येष्ठ कवी आणि मन करारे प्रसन्न या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. संजय उपाध्ये यांनी दिली.
विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हातून जे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम साकार झाले, त्यामध्ये आळंदी येथे टिकावू व सुंदर घाट, गरुडस्तंभ, रामेश्वर (रूई) येथे भगवान गौतम बुध्द विहार, विश्वधर्मी श्रीराम-रहिम मानवता सेतू आणि तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा विश्वशांती घुमट यांचा समावेश आहे. या त्यांच्या कार्याचा एक परमोच्च बिंदू म्हणजे उत्तराखंड येथील परमपवित्र बद्रिनाथ धामाजवळ उभारण्यात आलेले श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान धाम होय!  
भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर या पृथ्वीवरील श्री सरस्वतीचेच जणु मूर्त रूप होत्या. ‘संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांत रसाची अनुभूती’ ह्या संकल्पनेचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे लतादीदी!
जवळजवळ ८० वर्ष आपल्या दैवी स्वराने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणार्‍या श्रीमती लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वैकुंठगमन झालं. संगीतक्षेत्रामध्ये खर्‍या अर्थाने कधीच भरून न येणारी ही पोकळी निर्माण झाली. हा शाश्वत सूर हरपल्यामुळे प्रत्येकालाच आपल्या घरातलं कुणीतरी गेलं आहे, अशी भावना दाटून आली. लतादीदींचा प्रत्येक सूर म्हणजे गानदेवी सरस्वतीचा उच्छ्वास होता. देवी शारदेच्या भगिनीसमान असलेल्या लतादीदी परत आपल्या भगिनीगृही गेल्या अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली.
या भावनेचा आदर ठेऊन व ह्याच भावनेचे एक प्रतीकात्मक स्वरूप म्हणून लतादीदींचा एक सुंदर असा सुवर्णांकित ब्राँझचा पुतळा, माणा गाव, बद्रिनाथ, उत्तराखंड येथे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे नुकत्याच उभारण्यात आलेल्या श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिरातील गाभार्‍यात स्थापित करण्यात येणार आहे. त्यामुळे सरस्वती मंदिराच्या ह्या गाभार्‍यात नादब्रह्माचा एक अलौकिक आणि ऐतिहासिक असा आविष्कार निर्माण होणार असून, विश्वशांती व विश्वकल्याणाचा एक वेगळाच संदेश संपूर्ण जगाला दिला जाणार आहे.
सदरील हृद्य समारंभानंतर उपस्थित मान्यवर व पाहुण्यांसाठी प्रसाद भोजन आयोजित करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...