पुणे : गणपती बाप्पाचा आम्हाला आशीर्वाद आहे. बाप्पा मला चांगले काम करण्याची प्रेरणा देतो त्यामुळे मी मनोभावे गणपतीची सेवा करत असतो. असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी श्री गणेशाचे आगमन झाले. त्यांनतर ते बोलत होते.
श्री बापट म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आमच्याकडे गणेश मूर्तींचा संग्रह आहे. जवळपास ५०० हुन अधिक गणपती मी कार्यकर्त्यांना त्यांच्या देवाऱ्यात ठेवण्यासाठी दान केल्या आहेत. अजूनही आमच्याकडे १०० हुन अधिक गणेशमूर्ती आहेत.
आमच्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो. याकाळात नातेवाईक, मित्रपरिवार मनोभावे गणपतीची सेवा करतो.
गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी घडलो. त्यामुळे सामाजिक कार्य करतच मंत्री पदापर्यंत पोहचलो आहे.आजच्या दिवशी आमच्या हातून अधिकाधिक चांगले कार्य घडो एवढाच आशीर्वाद श्री गणरायाच्या चरणी मागितला. असेही ते म्हणाले.