क्रेडाईचा पीएमएवाय पुरस्काराने सन्मान

Date:

पुणे :- आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी परवडणाऱ्या घरांच्या गृहनिर्मितीमध्ये  दिलेल्या असामान्य योगदानासाठी क्रेडाईला अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पीएमएवाय पुरस्काराने केंद्रीय राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते दिल्ली येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.

‘पी.एम.ए.वाय- एम्पॉवरिंग इंडिया अवार्ड्स २०१९’ची संकल्पना ही प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप (पीपीपी) आणि खासगी गुंतवणूकीच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला  प्रोत्साहन देण्यासाठी  खासगी विकसक,वित्तीय संस्था,ओद्योगिक संघटना यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना प्राधान्य देऊन पंतप्रधानांचे सर्वांना २०२२ पर्यत घरे मिळावीत  हे  ध्येय पूर्ण करणे असे होते.

क्रेडाईने केंद्र सरकारशी अहमदाबाद मध्ये ३९६ परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प देण्याचा सामंजस्य करार केला होता. तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या ५ वर्षात ५ लाखांहून अधिक घरांची निर्मितीसाठी  देखील क्रेडाई – महाराष्ट्रने राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्रामध्ये ३० स्क्वेअर मीटरच्या  ४ लाख घरांची आणि ६०  स्क्वेअर मीटरच्या  ८ लाख घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. या घरांचे काम येत्या २ ते ४ वर्षात पूर्ण होईल. या सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी क्रेडाई नैशनलच्या अफोर्डेबल हौसिंग कमिटीचे अध्यक्ष आणि क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला असून त्यात कामे योग्य पद्धतीने सुरु आहेत जी दिलेल्या वेळेत पूर्ण होतील अशी माहिती दिली.

विकसकांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘अफोर्डेबल हौसिंग गाईडन्स फोरमची ’ क्रेडाई महाराष्ट्रने स्थापना केली असून त्याद्वारे राज्यस्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विशेष कायदेशीर सहाय्य विभाग, बांधकाम खर्चाचे प्रशिक्षण,कामगारांचे कौशल्य प्रशिक्षण आणि २४x७ अफोर्डेबल हौसिंग संदर्भातील हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर ही समिती देशभरातील  १२५०० सदस्यांना परवडणाऱ्या घरांच्या निर्मातीसंबंधी वेगवेगळ्या पैलूंची माहिती सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी  मागच्या ५२आठवड्यांपासून प्रत्येक रविवारी ई-बुलेटीन पाठविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.

तसेच परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीची संपूर्ण माहिती देणारे  “हौसिंग फॉर ऑल पॉलिसी ॲन्ड प्रैक्टिस” या पुस्तकाचे प्रकाशन १४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडीअम येथे ‘क्रेडाई युथकॉन’मध्ये केंद्रीय राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते देशातील ३००० विकसकांच्या उपस्थित झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताने बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवले

भारताने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून क्रॉस-बॉर्डर पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेल पाठवणे...

व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे दावे दिशाभूल करणारे, शासनाकडून महत्त्वाचे आवाहन

आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे...

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...