पुणे- शहर कॉंग्रेसच्या वतीने कर्वे रस्त्यावर मोदी सरकारच्या विरोधात ,पोलीस बंदोबस्तात गाजर आंदोलन सुरु होते . आणि आश्चर्य म्हणजे हे आंदोलन पाहून चक्क जनतेने उत्स्फूर्ततेने आंदोलकांना दाद दिली . एक वयस्क महिला , आणि एक विद्यार्थी आंदोलकापर्यंत पोहोचले आणि आम्हालाही माईक वर बोलू द्यात म्हणून त्यांनी काही वाक्ये बोलून सरकारबद्दल असंतोष नोंदविला .अनेकांनी बसमधून जाताना खिडकीतून ,दरवाजातून आंदोलकांना हात करून दाद दिली .
असे चित्र सहसा दिसत नाही ते या आंदोलनात दिसले .शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन काल करण्यात आले ,यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ,तसेच अभय छाजेड ,अजित दरेकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .