पुणे- भाजप शिवसेनेची युती नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये देखील आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे . याबाबतची अधिकृत घोषणा मुंबईतूनच शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे थोड्याच वेळात करतील असे अधिकृत रीत्या सांगण्यात आले आहे
कॉंग्रेस ने राष्ट्रवादीकडे ६७ जागांची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीने हा प्रस्ताव फेटाळत ६० जागा काँग्रेसला देण्यास तयारी दाखविली होती.
हा प्रस्ताव अमान्य झाल्याने काँग्रेसने स्वबळाची तयारी दाखवत १६२ उमेदवारांची छाननी करण्यास सुरूवात केली आहे. आज सायंकाळी दोन्ही पक्षांच्या वतीने आघाडी तुटल्याचे घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे युती पाठोपाठ आघाडी तुटल्यानंतर चारही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी दाखवली आहे.