पुणे-केंद्रातील मोदी सरकारने नागरिकत्व दुरूस्ती विधेयक घटनेची पायमल्ली करून या देशात लागू
केले. याच्या निषेधार्थ तसेच दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर अमानुषपणे
लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज ना. गोपाळकृष्ण गोखले
चौक (गुडलक चौक), फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘मोदी सरकारने या देशामध्ये जाती व
धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे धोरण आखले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या घटनेची
पायमल्ली करण्याचे काम मोदी-शहा ही जोडी करीत आहे. देशात नागरिकत्व दुरूस्त विधेयक लागू करून
देशातील अनेक राज्यात जाळपोळीच्या घटना झाल्या आहेत ते या विधेयकामुळेच, वर्षाकाठी २ कोटी
रोजगार उपलब्ध करून देतो असे सांगून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तरूण पिढीची बरबादी तर केलीच
शिवाय देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात केंद्राच्या
अधिपथ्याखाली असणाऱ्या पोलीस दलाच्या हातून विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ
आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि हा लढा जो पर्यंत
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मागे घेत नाही तो पर्यंत चालूच राहणार.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड हे यावेळी बोलताना म्हणाले की,
‘‘केंद्रातील मोदी सरकार काश्मिरच्या कलम ३७० तसेच राममंदिर हा विषय घेऊन सत्तेवर आले होते. कलम
३७० रद्द केल्या नंतर व मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिराचा निर्णय झाल्यावर जनतेला वाटले होते
की आता तरी मोदी हे देशाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीकडे लक्ष देऊन देशाला आर्थिक मंदितून बाहेर
काढण्यासाठी काही उपाय योजना करेल. परंतु या सर्व गोष्टी टाळून देशामध्ये जातीय व धार्मिक तणाव
निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे काम हे मोदी सरकार करीत आहे. बेरोजगारी वाढत असताना
तरूणांच्या हाताला काम द्यायचे सोडून दंगली भडकविण्याचे साधन म्हणून मोदी वापर करीत आहे.’’
यावेळी पक्षनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, नीता रजपूत, अजित दरेकर, संगीता
तिवारी, रमेश अय्यर, अविनाश बागवे, दत्ता बहिरट, बुवा नलावडे, सचिन आडेकर, क्लेंमट लाजरस, सुजित
यादव, राजू शेख, साहिल राऊत, नारायण पाटोळे, बाळासाहेब दाभेकर, किरण मात्रे, सुमित डांगी, लता राजगुरू,
चाँदबी नदाफ, संगीता पवार, रजनी त्रिभुवन, रविंद्र धंगेकर, आबा बागुल, सुरेखा खंडागळे, सोनाली मारणे,
उस्मान तांबोळी, विकास टिंगरे, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, विजय खळदकर,
सतिश पवार, सुनिल घाडगे, अजिज सय्यद, रमेश सकट, मुख्तार शेख, द. स. पोळेकर, रवि पाटोळे, अरूण
गायकवाड, विठ्ठल थोरात, शानी नौशाद, विनय ढेरे, साहिल केदारी, विशाल मलके, अनंतराव गांजवे, दादा
भोंदे, सुरेश कांबळे, अमरसिंग मक्कड, अनिल सोंडकर, चैतन्य पुरंदरे, ॲन्थोनी जेकब, संदिप मोकाटे, राजू
साठे, शाबिर खान, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, शेखर कपोते, भगवान धुमाळ, वाल्मिक जगताप, राजेश
शिंदे, विठ्ठल गायकवाड, भगवान कडू, मुन्नाभाई शेख, आसिफ शेख, शिवाजी बांगर, राजेंद्र शिरसाट, रवि
मोहिते, बबलू सय्यद, ज्ञानेश्वर निम्हण, अविनाश अडसुळ, गौरव बोराडे, शोभना पण्णीकर, नंदा ढावरे, बेबी
राऊत, सुनिता नेमूर, संगिता क्षिरसागर, ताई कसबे, अजित जाधव, फिरोज शेख, शिलार रतनगिरी, अनिल
अहिर, अजय खुडे, प्रकाश पवार, रामविलास माहेश्वरी, सुरेश उकिरंडे, पोपट पाटोळे, कुमार जाधव, भोला
वांजळे, संजय कवडे, राहुल तायडे, आदी उपस्थित होते.
या आंदोलनामध्ये सिम्बॉयसिस कॉलेज विमान नगर, एम.आय.टी. कॉलेज, बी.एम.सी.सी. कॉलेज,
मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज व पुणे विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.
पक्षनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. निषेध आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने
झाली.