Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मराठीच्या पडद्यावर ‘छोटा राजन’ गरजणार ?

Date:

 

हाजी मस्तान, दाऊद, वरदराजन, अरुण गवळी  यांच्या आख्यायिकांवर/ दंतकथांवर आधारीत अगणित सिनेमे येऊन गेले. विशेष म्हणजे वास्तव्यातील या कुख्यात खलनायकाच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटांना सिनेरसिकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे हिंदीच नव्हे तर मराठीतही असे सिनेमे येत आहे. ऱ्हिदम मुव्ही प्रेजेंटसोबत मुदिता फिल्म आणि अनुसया एंटरप्रायजेस प्रस्तुत राजन हा सिनेमा लवकरच मराठीच्या सिल्वर स्क्रीनवर झळकणार आहे. भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा कुख्यात अंडरवल्ड डॉन छोटा राजनवर आधारित आहे. मराठी चित्रपटात यापूर्वी कधीच न झालेला असा थरार ‘राजन’ या चित्रपटामार्फत सिनेरसिकांना अनुभवायला मिळणार आहे. खास करून, छोटा राजन याच्या हयातीत त्याचा जीवनपट मराठीच्या पडद्यावर साकारण्याचा धाडस मराठीचा कोणता अभिनेता करत आहे? हे सध्या गुपितच आहे.
याबद्दल सांगताना या सिनेमाचे लेखक तसेच दिग्दर्शक भरत सुनंदा सांगतात की, आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची धडपड प्रत्येक माणूस करत असतो, समाजात आपली विशेष ओळख बनविण्यासाठी निर्धारित लक्ष्य गाठण्याचा अट्टाहास तो करतो, मात्र त्याची हि जिद्द कधी कधी त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते, आणि त्यातूनच त्याच्या आयुष्यात होत असलेले बदल मी कागदावर उतरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गौतम सतदिवे, दर्शना सागर भांडगे, दिप्ती श्रीपत यांची निर्मिती आणि कल्याण शिवाजी कदम, धनुष खंडारे, हेमंत वामनशेठ पाटील यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा मराठीतील दर्जेदार सिनेमांच्या यादीत समाविष्ट होईल, यात शंका नाही.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...

नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर...