पुणे- उद्या भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असताना ,तत्पूर्वीच म्हणजे आज सकाळीच शिवसेनेने माजी आमदार महादेव बाबर आणि स्थानिक नगरसेविका संगीता ठोसर यांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन करून भाजपला तडाखा दिला आहे .
या वेळी माजी आमदार महादेव बाबर आणि नगरसेविका संगीता ठोसर यांनी सांगितले कि, ‘या रस्त्याचे काम रखडल्याने कित्येक जीव अपघातात बळी गेले . निव्वळ मलिदा खाण्यासाठी या रस्त्याची टेंडर प्रक्रिया राबविली गेली , आणि चारवेळा निविदा काढल्या गेल्या शिवसेनेच्या नगरसेविका संगीता ठोसर यांनी वारंवार यावर आंदोलने केली सभागृहात आवाज उठविला . मनसे आणि राष्ट्रवादीनेही मलिदा खाण्याचा डाव उधळून लावण्यात मोठी महत्वपूर्ण भूमिका निभावली . आता कुठे या साऱ्या प्रयत्नांना यश येत असताना भ्रष्टाचारी आमदाराच्या नादी निष्कलंक मुख्यमंत्र्यांनी लागू नये आणि त्यांच्या पापात धनी होऊ नये .
आमदार या कामाचे श्रेय लादू पाहत आहेत .पण हे काम महापालिकेच्या माध्यमातून होते आहे . यात आमदारांचा एक पैशाचाही संबध नाही . आम्ही सातत्याने संघर्ष करून कात्रज कोंढवा रस्त्याची आमदारांनी निर्माण करून ठेवलेला तिढा आता सोडविला आहे . त्यामुळे आता त्यांना भूमिपूजनाचा नाही तर भूमिपूजनाचा हक्क आम्हाला आहे