पुणे, दि. २१ जानेवारी २०२३: शहरातील विविध सेवाभावी संस्थांच्या सामाजिक कार्यात सहभागी होणारे व महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना नुकताच राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वानवडी येथील राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. मात्र मुंबई येथील महत्त्वाच्या कार्यालयीन कामामुळे मुख्य अभियंता श्री. पवार या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. त्यानंतर शुक्रवारी (दि. २०) फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर बुटे पाटील यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. अनिल रोकडे, श्री. अनिल सावंत, ज्ञान फाउंडेशनचे श्री. मनोहर कोलते, श्री. शिवाजी शिंदे, श्री. दीपक मंचाळकर, श्री. महेश देशमुख, श्री. अमर परदेशी, श्री. निखिल टेकवडे, श्री. हेमंत शिंदे आदींची उपस्थिती होती.