पुणे –सरकारने जो 1314 सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला याविरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आले शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा छात्रभारती राज्यभर आक्रमक मार्गाने आंदोलन करेल असा इशारा यापूर्वीच संघटनेने दिला होता परंतु तरीदेखील शिक्षणमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही
राज्य सरकारने एकीकडे पटसंख्या कमी असल्याची कारण दाखवत दुसरीकडे खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देत आहेत सरकारी शाळांची गुणवत्ता व पटसंख्या अभावी या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला परंतु शाळांची गुणवत्ता सुधारणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे राज्य सरकार सरकारी शाळा बंद करून खासगीकरणाला प्रोत्साहन देत आहेत परंतु यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागणार आहे
शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून छात्रभारती संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या दिशा शेख यांनी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी छात्रभारती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव स्वप्नील मानव व कार्याध्यक्ष संदीप आखाडे अध्यक्ष दिनेश कोळी समृद्धी जाधव तुकाराम डोईफोडे सारिका मुर्तडक ओंकार मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

