पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्टेट इलिजीबिलीटी टेस्ट (सेट) परीक्षेमध्ये पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या एम. एस. डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या दोन विद्यार्थ्थानी समाजकार्य(एम. एस. डब्ल्यू) विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
एम. एस. डब्ल्यू द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तुषार दोडमिसे व स्वाती केदार यांनी यावर्षी प्रथमच सेट परीक्षा दिली होती व पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांनी उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे. तुषार दोडमिसे व स्वाती केदार यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सी एस आर सेलचे मानद संचालक डॉ. महेश ठाकूर, ज्येष्ठ प्रा. डॉ अनुराधा पाटील व समुपदेशन अभ्यासक्रम समन्वयक प्रा. चेतन दिवाण यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.
डॉ. ठाकूर, डॉ. पाटील व प्रा. दिवाण तसेच सी. एस. आर. व समुपदेशन अभ्यासक्रमाच्या उपस्थित विद्यार्थ्यांनी सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

