पुणे- कोरोना च्या संकटाने वेढले आहे, लोकांनी घराबाहेर पडू नये हे सारे खरे आहे, पण खरेच लोकांनी बाहेर पडू नये यासाठी महापालिका आणि पोलीस यांनी अगोदर काय केले पाहिजे याबाबत काही मागण्या भा.ज.पा. चे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्या आहे .
महाराष्ट्रात एकूणच करोनाचे संकट नियंत्रणात येत असतानाच मुंबई व परिसर, व पुण्यमध्ये हे संकट गडद होत चालले आहे. पुण्यातील संख्या 700 च्या पुढे गेली आहे.त्यामुळे प्रशासनाच्या काय उपाययोजना सुरू आहेत याची माहिती घेण्यासाठी, काही सूचना करण्यासाठी, सहकार्याचा हात पुढे करण्यासाठी आज भा.ज.पा. चे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली… यावेळी त्यांनी पुढील मागण्या केल्या .
1) पुण्यात ज्या भागांमध्ये रुग्ण सापडत आहेत त्यासाठी सुरक्षा कडक करावी
2) लोकांनी 10 दिवस घराच्या बाहेर पडू नये यासाठी प्रशासनाने दूध पावडर सहित ( जेणे करून दुधासाठी बाहेर पडू नये) धान्य व किराणा सामानाचे किट ह्या भागातील लोकांना मोफत द्यावे.
3) 60 वर्षावरील सर्वांना ( घरच्यांच्या संमतीने) लक्षणे दिसत नसतानाही जवळच्या शाळा, मंगल कार्यालये, लॉजेस, हॉटेल्स मध्ये स्थलांतरित करावे ( अतिशय चांगल्या सुविधा त्या ठिकाणी असाव्यात)
4) केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार परंतु रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आयुर्वेदीक, होमियोपॅथिक औषधे नागरिकांना वाटावीत.
अश्या सूचना त्यांनी केल्या व सर्वप्रकारच्या सहकार्याची तयारी दर्शवली…