Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Special

महाराष्ट्राच्या राजकारणातले कर्तृत्त्ववान नेते

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे अभ्यासू,कर्तृत्त्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होय. आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल थोडंसं सांगावं वाटतं.माझा आणि त्यांचा परिचय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी...

अन् मदतीसाठी सरसावले अनेक हात….!

नैसर्गिक आपत्ती होते तेव्हा त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. हवामानासबंधी नैसर्गिक आपत्तींमध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, वन्य अग्नी, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा आणि शीतलहरी यांचा...

धारावी: मानवी चेहऱ्याचे पुनर्निर्माण (लेखक-गौतम अदाणी)

माजी जागतिक हेवी वेट मुष्टियुद्ध विजेता माईक टायसन याने आपल्या बकेट लिस्ट मध्ये भारतातील ताजमहाल आणि धारावी हि दोन ठिकाणे असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. माझी धारावीची पहिली ओळख ही  १९७० च्या दशकाच्या अखेरीस झाली. त्यावेळी मी मुंबईत नवीनच दाखल झालो होतो आणि मी मुंबईत एक अनाम युवक होतो, ज्याला या शहरातील संधींनी आणि हिरा व्यापारात आपले नशीब आजमावून पाहण्याच्या ओढीने खेचून आणले होते. त्यावेळी सुद्धा धारावी अनेक धर्म, संस्कृती, भाषा यांचा मिलाफ घडवणारे केंद्र होते, जिथे भारतातील कानाकोपऱ्यातून पोटापाण्याच्या उद्दोगासाठी आली होती. त्यावेळी मी धारावीतील औद्योगिक  कोलाहलाने मंत्रमुग्ध झालो होतो. धारावीच्या गल्ल्यातून भारतात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषेचे प्रतिध्वनी सारख्याच त्रीव्रतेने ऐकू येत असत पण या साऱ्या कोलाहलाहि स्वतःची अशी एक लय होती.  मला त्या लयीची व्याख्या करता आली नाही, पण तिचे अस्तिस्त्व मला प्रखर पणे जाणवले होते.  धारावीची भेट हि एकाच एकाच वेळी विनम्र आणि अस्वस्थ करणारा अनुभव होता. धारावीतील लोकांचा रोजचा जगण्याचा संघर्ष पण त्याचवेळी आलेल्या परिस्थितीला शांतपणे आणि आनंदाने सामोरे जाण्याच्या वृत्तीने मला प्रेरित केले पण त्याचवेळी माझ्या मनात एक प्रश्न घर करून बसला, कधीतरी इथल्या लोकांची परिस्थिती बदलेल का? आजही हा प्रश्न मला सतावत असतो.  मुंबई विमानतळावर  जेंव्हा जेंव्हा मी मुंबईत विमानातून उतरतो तेंव्हा धारावी एखाद्या  मानवी  गोधडी सारखी भासते.  या दर्शनाने  एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे भिन्न पार्श्वभूमीच्या स्थलांतरितांना उदारपणे सामावून घेण्याची मुंबईची क्षमता पण त्याचवेळी धारावी या गोष्टीची ही आठवण करून देते कि या वस्तीत राहणारे लोक अजूनही आपल्या पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जेंव्हा धारावीच्या पुन्नराजीवनाची संधी चालून आली त्यावेळी मी ती दोन्ही हातानी घट्ट पकडली. मला काहीही करून हि संधी हातातून जाऊ द्याची नव्हती आणि या अतिउत्साहात आम्ही जी बोली लावली ती दुसऱ्या बोलीपेक्षा २.५ पट अधिक होती. कदाचित या साऱ्याचा संबंध मुंबईच्या पहिल्या दर्शनाने माझ्यावर जी अमीट अशी छाप सोडली याच्याशी असावा.  आता मात्र एक नवीन अभिनास्पद आणि उद्देशपूर्ण सुरवात होत आहे. हि एक नवीन धारावी निर्माण करण्याची संधी आहे जी सर्वसमावेशक असेल आणि त्याच बरोबर इथल्या रहिवाश्याना सन्मान आणि सुरक्षा पुरवेल.  आम्ही अशा एका प्रवासाला सुरवात करत आहोत कि जो आज पर्यंतच्या इतिहासात कोणीच हाती घेतलेला नाही, मला या प्रवासातील पर्वतावेढ्या आव्हानांची कल्पना आहे. आपण जरी सिंगापूरने  घरांचे संकट सोडवण्यासाठी १९६० च्या दशकात जो पथदर्शी प्रकल्प हाती घेतला होता त्याच्याशी जरी आपण तुलना केली तरी, धारावी प्रकल्प हा तीन कारणांसाठी एक आगळावेगळा प्रकल्प आहे. सर्वप्रथम हा जगातील सर्वात मोठा शहरी पुनर्वसन आणि पुनरुत्थानचा प्रकल्प आहे. जवळपास १० लाख लोकांचे या प्रकल्पांतर्गत पुनर्वसन होणार आहे. धारावी प्रकल्पात फक्त रहिवास्यांचेच पुनर्वसन होणार आहे असे नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि विभिन्न आकाराच्या औद्योगिक आणि व्यापारी संस्थांच्या पुनर्वसनाचा हि यात समावेश आहे. आणि या सर्वांचे सुयोग्य पुनर्वसनसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यात दोन्ही पात्र आणि अपात्र गाळेधारकांचे समग्र आणि सर्वसमववेषक पुनर्वसन या प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे   माझ्या मनात धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात कोणत्याही साचेबद्ध कल्पना वा धारणा नाहीत. मात्र माझ्याकडे आहे ती धारावीकरांचे आयुष्य बदलण्याची सदिच्छा आणि हा प्रकल्प यशस्वी करण्याचा दृढ निश्चय. हे निशिचीत आहे धारावीच्या पुनर्निर्माण हे मानवी चेहऱ्याचे असेल. हा एक सर्वसमावेशक प्रकल्प असेल ज्यात जास्तीत जास्त लोकांच्या मतांचा समावेश पुनर्विकास धोरणात केला जाईल. आम्ही एक संस्थमक प्रक्रिया राबवू ज्यात आम्ही फक्त धारावीकरांशीच सल्लामसलत करू असे नाही तर सर्व बुद्धीमंत मुंबईकर ज्यांना या प्रकल्पाबद्दल आस्था आहे त्यांच्याशी सल्लामसलत करायला आम्ही तयार आहोत कारण आम्हाला असे वाटते कि धारावीच्या पुनर्निर्माणात  सर्वच मुंबईकरांचा सहभाग असला पाहिजे. धारावीच्या पुनर्निर्माणात मुंबईचे स्वतःचे असे एक जे चरित्र आहे त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसेल. मुंबईचे चारित्र्य म्हणजे तिचे चैतन्य, हिम्मत, विविधतेतील एकात्मता, तिचे विविध रंग आणि निर्धार याचे दर्शन नव्या धारावीत होईल पण त्याचवेळी धारावीचा कालजयी  आत्मा हरवणार नाही याची ही आम्ही काळजी घेऊ.  आम्ही असे एक शहर निर्माण करू इच्छीतो जे अत्याधुनिक असेल आणि ज्यात २१ व्या  शतकातील भारताचे प्रतिबिंब पडेल, असा भारत जो  पुनरुत्थानाच्या मार्गावर वेगाने मार्गक्रमणा करत आहे , असा भारत जो स्वतःबद्दल आश्वस्त आहे आणि असा भारत ज्याने जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे कारण २१ वे शतक हे भारताचे आहे.  सर्व पात्र गाळे धारकांना मी आश्वस्त करू इच्छीतो कि त्यांचे प्रकल्प निर्मितीच्या काळात कुठेही विस्थापन होणार नाही. त्यांना फक्त एकदाच त्यांच्या राहत्या घरातून बाहेर पडावे लागेल ते म्हणजे नवीन घरात प्रवेश करण्यासाठी. त्यांच्या नवीन घराची निर्मिती ही फक्त त्यांच्या डोळ्यासमोर होणार असे नाही तर त्या निर्मिती प्रक्रियेत त्यांना हि घरे कशी असावीत हे ठरवण्यात त्यांचा सहभाग असेल. सध्या त्यांच्या घरात ज्या सुविधांची वानवा आहे जसे कि गॅस, पाणी, वीज, स्वछता आणि सांडपाणी निर्मूलन, आरोग्य सुविधा, विरंगुळ्यासाठी सुविधा, आणि मोकळ्या जागा यांनी हि घरे युक्त असतील.  तसेच धारावीकरांना जागतिक दर्जाच्या शैक्षिणक आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्द करून दिल्या जातील. अभावग्रस्ततेचे दिवस आता जाणार आणि एका नवीन धारावीचे निर्माण होणार जिच्या रहिवास्यांचा उर आम्ही धारावीचे रहिवासी आहोत हे सांगताना अभिमानाने भरून येईल. रहिवास्यांच्या पुनर्वसनानंतर सर्वात मोठे आव्हान असेल ते इथल्या रोजगार निर्मिती केंद्रांचे पुनर्निर्माण. मला धारावीचा कायाकल्प एका आधुनिक  उद्दोग केंद्रात करायचे आहे ज्याद्वारे इथल्या सूक्ष्म आणि लघु उद्दोगांचे पुनर्वसन तर होईलच पण त्याच बरोबर धारावी हे नवीन युगातील रोजगाराचे केंद्र होईल आणि या उपक्रमाचे विशेष लक्ष्य हे महिला आणि युवक असतील. यासाठी बहुपेढी व्युव्हरचना अंमलात आणली जाईल आणि त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नगरी गट यांची मदत घेतली जाईल.  यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारली जातील ज्यांचा भर हा कौशल्य विकासावर असेल,  सामायिक सुविधा केंद्र उभारली जातील ज्यात सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांचा समावेश असेल. तसेच संशोधन केंद्र, डेटा सेन्टर (विदा केंद्र) सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्द्योग सुविधा केंद्र यांचाही समावेश असेल. या पुनर्विकासाचा अजून एक महत्वपूर्ण घटक असेल तो म्हणजे ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स  वर आधारित एका संघटित आणि योजनाबद्ध बाजारपेठेचा विकास. धारावी पुनर्विकासाचे प्रयत्न हे गेली अनेक वर्ष केली जात आहेत, याला  जवळपास ५० वर्षांचा इतिहास आहे परंतू यावेळी काही महत्वपूर्ण बदल निविदा प्रकियेत करण्यात आले आहेत जसे की अपात्र गाळेधारकांचे पुनर्वसन, रेल्वेच्या ४५ एकर जागेचा समावेश ज्यामुळे गाळेधारक जिथे राहतात तिथेच त्यांचे पुनर्वसन शक्य झाले आहे आणि यासर्वांमुळे धारावीचा विकास हा विनालंब सुरु होऊ शकतो. मी याठिकाणी हे जरूर नमूद करू इच्छीतो  कि आज जे या प्रकल्पाला मूर्त स्वरूप येत आहे त्यासाठी  महाराष्ट्रातल्या सर्वच सरकारांनी प्रयत्न केले आणि बांधिलकी दाखवली आणि राज्यातल्या  सर्व राजकीय पक्षांचा  ही पाठिंबा मिळाला.  तसेच या सर्व प्रयत्नांना केंद्र सरकारची हि मोलाची साथ लाभली ज्यांनी या प्रकल्पासाठी रेल्वे ची जमीन उपलब्ध करून दिली.  मी आणि माझे सहकारी याना या  प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या हिमालय एवढ्या मोठ्या आव्हानांची कल्पना आहे. आकस्मीक परिस्थीला हाताळण्याची आमची क्षमता, कार्यक्षमता आणि प्रकल्प अंमलबजावणीचे आमचे कौशल्य याची कसोटी या प्रकल्पात लागणार आहे.  गेल्या काही वर्षात अदाणी समूहाने प्रश्नांची उत्तरे शोधणारी कार्यसंस्कृती विकसित केली आहे जिला आमच्या प्रेरित, अनुभवी आणि उत्साही टीमचा आधार आहे. मला विश्वास आहे कि सर्व भागधारकांच्या पाठिंब्याच्या बळावर आम्ही इतिहास घडवू आणि धारावी, मुंबई आणि भारताला गौरवास्पद कामगिरी करू. आमचे हे कार्य पूर्ण झाल्यावर माईक टायसनने जर  धारावीला परत भेट दिली तर ती त्याला ओळखू येणार नाही पण त्याला हे पण दिसून येईल कि धारावीचा आत्मा ह्या पुनर्निर्माणच्या प्रक्रियेत हरवलेला नाही आहे. मला हा ही विश्वास आहे की दैवकृपेने, डॅनी बॉयल सारख्याना धारावीत अनेक मिलेनियर सापडतील पण त्यांच्यामागे स्लमडॉग हि उपाधी नसेल.    (लेखक हे अदाणी समूहाचे अध्यक्ष आहेत)

शेती समृद्धी; एक रूपयात पीक विमा !

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये राज्यात...

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता विविध योजना

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. समाजाच्या तळागाळातील घटकांना शासनाच्या...

Popular