Local Pune

‘गंगाजल’ मधल्या ‘सुंदर यादव ‘ चा महापालिकेत स्वैराचार ?

पुणे- महापालिकेच्या जागा , विविध क्रीडा संकुले, टेंडर ,नगरसेवक आणि त्यांची नातेवाईक घेत असल्याचा आरोप आता सर्रास होतो आहे , परवा तर मुख्य सभेत...

योगाच्या माध्यमातून विश्‍वशांती साकारेल- डॉ.ए.सी.शुक्ला

पुणे:“योग आणि आत्मज्ञानाने प्रेरित होऊनच आपण विश्‍वशांती स्थापित करू शकतो. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून निर्माण होणारे ज्ञान-विज्ञान हे विश्‍व शांतीसाठी सर्वात प्रेरक असेल....

यशस्वी उद्योजक बना- देआसराची एकदिवसीय कार्याशाळा संपन्न

पुणे- देआसरा फाऊंडेशनने एस एम जोशी सभागृह, पुणे येथे लघुउद्योजकांसाठी 'आर्थिक व्यवस्थापन' या विषयावर एक दिवसाची कार्यशाळाआयोजित केली होती. या कार्यशाळेत व्यावसायिकांना लघु उद्योग वाढीसाठी आथिर्क व्यवस्थापन व त्याचे महत्त्व या बाबतीतमार्गदर्शन करण्यात आले. देआसरा आगामी व्यवसायांमध्ये संपूर्ण प्रक्रियेद्वारे त्यांना मार्गदर्शन करण्याकरता व्यवसायात अडथळा-मुक्त दृष्टिकोन देण्यासाठीप्रसिध्द आहे.   ४० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणारे बँक ऑफ इंडियाचे माजी उपमहा व्यवस्थापक अधिकारी  वरिष्ठ अधिकारी श्री. सुधीर गिजरे जेदेआसरामध्ये मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्धृत केले की "नवउद्योजकांनी ग्राहकांच्यासेवा आणि समाधानावर परिणाम होऊ न देताही आपल्या वैयक्तित खर्चाचा ताळेबंद ठेवणे आवश्यक आहे. देआसरा फाऊंडेशनच्या श्री.प्रकाश आगाशे म्हणाले की, "एखाद्या व्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी यशस्वी उद्योजकाने कठोर आर्थिक साक्षरता आणिव्यवस्थापन ही प्रमुख कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.” कार्यशाळेमुळे आर्थिक व्यवस्थापनासाठी मदत झाली आणि विकास, आर्थिक नियोजन, रोख प्रवाह व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापनआणि संसाधन व्यवस्थापन यासाठी आर्थिक धोरणांकडे वाटचाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेत सहभागी होणा-या व्यवसायात नियोजन, निर्णय घेण्याचे मूल्य आणि मूल्य निर्माण करण्याच्या महत्वाच्याव्यवस्थापनात्मक बाबींचे समर्थन करण्यासाठी आणि जोखीम आणि संधींचे मूल्यांकन करण्यासाठी या वित्तीय माहितीची मदतमिळाली. या कार्यशाळेत बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री आर.आर.शांताप्पा , श्री ओंकार कुमार,श्री.शशिकांत एम चौधरी,  श्री.अनिल सावंत,  श्रीमंत आनंद, श्री. नितीन भार्गवे मुख्य प्रबंधक श्री. लवाळे , श्री. राजेश कुमार बैठा , आणि श्री. उमेश जोशीयांची उपस्थिती होती तसच शंभरहून अधिक उद्योजकांनी या कार्यशाळेद्वारे तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त केले. भविष्यात अनेक यशस्वीनवउद्योजक या कार्यशाळेद्वारे घडतील असा आशावाद कार्यशाळेला उपस्थित असलेल्या उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

घोरपडी गावठाणातील वेशीवरच्या मारुती मंदिराचा जीर्णोद्वार व कळशारोहन सोहळा उत्साहात संपन्न

पुणे-घोरपडी गावठाणातील तालीम चौकातील वेशीवरच्या मारुती मंदिराचा जीर्णोद्वार व कळशारोहन सोहळा पार पडला . आळंदीचे श्री. श्री. श्री. शंकर महाराज यांच्याहस्ते कळस बसविण्यात आला...

जिल्हा खनिज प्रतिष्ठाणची बैठक संपन्न

पुणे,दि. 30:  जिल्ह्यातील खनिजकर्मविषयक कामासंदर्भात तसेच योजनासंदर्भात जिल्हा खनिज प्रतिष्ठाणची   बैठक शासकीय विश्रामगृह येथे अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश  बापट यांच्या अध्यक्षतेखाली...

Popular