पुणे, 30 मे 2024: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसरने लक्षणीय वैद्यकीय यश मिळवले आहे. वाशीमहून आलेल्या श्री संजय चव्हाण (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसरमध्ये यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्री चव्हाण गेल्या तीन वर्षांपासून लिव्हर सोरायसिसने त्रस्त होते. नवजीवन मिळवून देणाऱ्या या सर्जरीने वेळच्या वेळी वैद्यकीय उपचार करून घेण्याचे आणि अवयव दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
श्री चव्हाण यांना यकृताचे गंभीर आजार होते, बिलिरुबिन पातळी आणि अस्काइट्समध्ये वाढ झालेली होती. त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. ब्रेन हॅमरेज झालेल्या ४७ वर्षांच्या एक व्यक्तीने आपले यकृत दान केले. या दाता व्यक्तीला तातडीने सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये आणले गेले, याठिकाणी अवयव दानाची प्रक्रिया पार पाडली गेली.
या जीवनरक्षक प्रक्रियेमध्ये झेडटीसीसीच्या अवयव वाटप प्रक्रियेने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दाता व्यक्ती ज्या रुग्णालयात आहे तिथेच नोंदणी करण्यात आलेल्या रुग्णाला प्राधान्य दिले जाते. श्री संजय यांचे नाव सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये नोंदवण्यात आले होते, त्यामुळे प्रत्यारोपणासाठी त्यांना प्राधान्य दिले गेले.
डॉक्टर बिपीन विभुते, डॉ अपूर्व देशपांडे, डॉ अनिरुद्ध भोसले, डॉ दिनेश झिरपे, डॉ राधिका, डॉ मनीष पाठक, डॉ मनोज राऊत, डॉ शीतल महाजनी आणि डॉ किरण शिंदे यांच्यासह अत्यंत कुशल...
'विश्वशांतीरत्न' पुरस्काराचे वितरण
पुणेः शतकभरापूर्वी शिकाको शहरात भारत विश्वगुरू होणार हे स्वामी विवेकानंदांनी पाहिलेले स्वप्न, सत्यात उतरविण्याचा संकल्प घेतलेले प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड हे खऱ्याअर्थाने नवनिर्मितीचा एक प्रचंड मोठा...
पुण्याच्या रिंगरोडचे काम मिळविण्यासाठी भाजपाला तब्बल ९९६ कोटी दिल्याचा धंगेकरांचा आरोप-हेच पैसे आता ठेकेदार पुणेकरांकडून वसूल करणार
पुणे- पुणे रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत महायुती...
पुणे,दि.२८:- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील मतमोजणी केंद्राची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन मतमोजणीसाठी करण्यात...
पुणे, दि. २८ : मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मावळ...