पुणे-15 एप्रिल, २०२४: भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक वीज कंपन्या आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सोल्युशन्स पुरवणाऱ्यांपैकी एक, टाटा पॉवरने सार्वजनिक, अर्ध-सार्वजनिक, बस/फ्लीट आणि संपूर्ण भारतातील होम चार्जर विभागात १० कोटी (१०० मिलियन) हरित किलोमीटरपर्यंत वीज पोहोचवणारी पहिली इव्ही चार्जिंग सोल्युशन्स पुरवठादार बनण्याचा मान मिळवला आहे. हे यश देशभरात शाश्वत मोबिलिटी सुविधांना प्रोत्साहन देण्यात टाटा पॉवर निभावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते.
वर्ष २०३० पर्यंत देशात होत असलेल्या वाहनांच्या एकूण विक्रीपैकी ३०% विक्री इलेक्ट्रिक वाहनांची असावी हे उद्दिष्ट घेऊन भारताने पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे व्हिजन आखले आहे. FAME आणि नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन यासारख्या योजनांच्या माध्यमातून इ-मोबिलिटीला चालना दिली जात आहे. इव्ही चार्जिंग सुविधांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन या परिवर्तनासाठी पायाभूत आवश्यकता म्हणून टाटा पॉवरने इझी चार्ज या नावाने आपल्या नेटवर्कमध्ये ८६००० पेक्षा जास्त होम चार्जर, ५३०० पेक्षा जास्त सार्वजनिक, निम-सरकारी आणि फ्लीट चार्जिंग पॉईंट्ससह ५३० शहरांमध्ये ८५० पेक्षा जास्त बस चार्जिंग स्टेशन्सचा समावेश केला आहे. वाहनचालकांच्या सुविधेसाठी हे चार्जर हायवे, हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल्स, कार्यालये, गृहसंकुले इत्यादी वेगवेगळ्या आणि भरपूर वाहतूक असलेल्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. टाटा पॉवरचे हे प्रयत्न भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वेगवान वाढीला पूरक ठरत आहेत.
उद्योगक्षेत्रातील एका अनुमानानुसार, वर्ष २०३० पर्यंत भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वार्षिक विक्री १ कोटींपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. टाटा पॉवर, देशभर पसरलेल्या आपल्या नेटवर्कसह या परिवर्तनामध्ये सर्वात आघाडीवर आहे.
इलेक्ट्रिक वाहने आणि इव्ही चार्जिंगच्या पायाभूत सेवांच्या मागणीतील वाढीबरोबरीनेच टाटा पॉवर आरएफआयडी कार्डसारख्या अनेक तंत्रज्ञान-सक्षम ग्राहककेंद्री सुविधा आणत आहे. या कार्डमार्फत वायरलेस पेमेंट करून इव्ही मालक खूपच सहजपणे tap.charge.go करू शकतात.
शून्य उत्सर्जन मोबिलिटीप्रती अतूट निष्ठेचे पालन करण्यासाठी टाटा पॉवरला 'शून्य इन्फ्रास्ट्रक्चर चॅम्पियन' हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. नुकताच नवी दिल्लीत दुसऱ्या वार्षिक शून्य फोरममध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीती आयोगाने २०२१ साली सुरु केलेल्या शून्य - झिरो पोल्युशन मोबिलिटी कॅम्पेनने अनेक महत्त्वपूर्ण भागीदारींना प्रोत्साहन दिले आहे. यामध्ये भारत सरकारचा नागरिकांना सहभागी करून घेणारा, जोडून ठेवणारा मंच MyGov आणि जवळपास २०० उद्योग भागीदार आहेत. या भागीदारींमध्ये सहभागी होऊन इ-कॉमर्स आणि खाद्य वितरण कंपन्या, राईड-हेलिंग सेवा, वाहन उत्पादक, फ्लीट एग्रीगेटर्स, पायाभूत सेवासुविधा प्रदान करणे आणि फायनान्सर इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टिममध्ये शुद्ध मोबिलिटी इकोसिस्टिमला आकार देण्यात सहायक भूमिका बजावत आहेत.
मुंबई –- जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म हा 23 अब्ज डॉलरच्या जेएसडब्ल्यू समूहाचा भाग असून, कंपनीने डॉ. रंजन पै यांची त्यांच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती...
· प्रिमियम मोटरसायकलच्या (300cc – 500cc) विशेष श्रेणीसह मोटरप्रेमी लोकांचे लक्ष वेधून घेते
· होंडाच्या मोठ्या बाइक्ससाठी अत्याधुनिक वन-स्टॉप विक्री आणि सेवा केंद्र
ठाणे, 12 एप्रिल 2024: प्रिमियम मोटरसायकल पुनर्परिभाषित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र) येथे होंडा बिगविंग या नवीन प्रीमियम मोटरसायकल विक्री आणि सेवा आऊटलेटचे उद्घाटन केले.
मोटारसायकलप्रेमी लोकांसाठी हे पाऊल अत्यंत आनंददायी आणि परिवर्तनशील असणार आहे. केवळ सर्वोत्तमाच्या शोधात असलेल्या बाईक रायडर्ससाठी हे BigWing डीलरशिप आऊटलेट एक सर्वोत्कृष्ट अनुभव देईल. ठाण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात वसलेल्या या अत्याधुनिक केंद्राचा उद्देश नवीन तसेच सध्या असलेल्या ग्राहकांमध्ये #GoRidin चा उत्साह वाढवणे हा आहे.
आपल्या अमूल्य ग्राहकांची छोट्यातली छोटी गरज पूर्ण करण्यासाठी हे BigWing डीलरशिप आऊटलेट अत्यंत उपयोगाचे आहे. हे BigWing आता देशभरातील 140 हून अधिक ऑपरेशनल टचपॉइंट्सवर उपलब्ध होईल.
प्रीमियम अनुभव
ब्लॅक अँड व्हाईट मोनोक्रोमॅटिक थीमने प्रभावित बिगविंग आपली वाहने अत्यंत अभिमानाने मिरवते. BigWing मधील उच्च प्रशिक्षित आणि जाणकार व्यावसायिक ग्राहकांना त्यांची गाडी किंवा त्याच्याशी संबंधित ऍक्सेसरीज संबंधी प्रश्नांचे निराकरण करण्यास मदत करतात. आपल्याला कोणती गाडी हवी, कोणती सूट होईल आणि कोणती अत्यंत उपयोगी ठरेल अशा सगळ्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे (www.HondaBigWing.in) या वेबसाइट उपलब्ध आहेत. शोध ते खरेदीपर्यंतचा तुमचा प्रवास इथे संपेल. वेबसाइटवरील ऑनलाइन बुकिंगचा पर्याय ग्राहकांना जलद, पारदर्शक बुकिंग अनुभव एका क्लिकवर मिळवून देतो. रिअल-टाइम ग्राहकांचा अभिप्राय मिळवण्यासाठी, Honda BigWing सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
ग्राहकांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करून, Honda BigWing इमर्सिव्ह डिजिटल अनुभव देते. व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म - https://virtualshowroom.hondabigwing.in वर ग्राहकांना त्यांच्या घरात आरामात बसून मोटरसायकल लाइन-अप, राइडिंग गीअर्स आणि ॲक्सेसरीज तपशीलवारपणे अनुभवता येतील.
विविध उत्पादन पोर्टफोलिओ
Honda च्या प्रीमियम मोटरसायकल रिटेल फॉरमॅटचे नेतृत्व BigWing...
२०२४ साठी रोमांचक अपडेट्ससह अत्याधुनिक बॉबर सादर
पुणे: वर्ष २०२४ साठीची महत्त्वाची घोषणा करताना जावा येझदी मोटरसायकलला आता फॉरवर्ड सेट फूट पेग आणि सुधारित मागील मोनो-शॉक यांसह काळजीपूर्वक बारकाईने...
ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी १५० पेक्षा जास्त शहरांत विस्तार
पुणे10 एप्रिल 2024 – पीएनबी हाउसिंग फायनान्स या भारतातील आघाडीच्या गृह कर्ज कंपनीने आज त्यांचे वितरण नेटवर्क भारतात...