Industrialist
टाटा प्रोजेक्ट्सने आर्थिक वर्ष २०२४ च्या आर्थिक निष्कर्षांची घोषणा केली
मुंबई, २ मे २०२४: टाटा प्रोजेक्ट्सने आर्थिक वर्ष २०२४ च्या आर्थिक निष्कर्षांची घोषणा केली.
शाश्वत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करणारी, भारतातील आघाडीची इंजिनीयरिंग, प्रोक्युअरमेंट व कन्स्ट्रक्शन कंपनी आणि जागतिक पातळीवरील नामांकित टाटा समूहातील एक सदस्य, टाटा प्रोजेक्ट्सने आर्थिक वर्षासाठीच्या आपल्या आर्थिक निष्कर्षांची घोषणा केली आहे.
टाटा प्रोजेक्ट्सचे एमडी आणि सीईओ श्री विनायक पै यांनी आर्थिक वर्ष २०२४ मधील कामगिरीविषयी सांगितले, "धोरणात्मक एकत्रीकरण, संघटनात्मक परिवर्तन आणि संचालनात्मक क्षमतांवरील भर याचे लाभ मिळू लागले आहेत. आम्हाला पुन्हा नफा मिळू लागला आहे आणि आम्ही नावीन्य व तंत्रज्ञानाच्या बळावर अंदाज करण्यायोग्य व शाश्वत प्रकल्प करण्याच्या मार्गावर पुढे जात आहोत याचा आम्हाला अभिमान आहे."
श्री पै यांनी पुढे सांगितले, "कामाची सुरक्षित जागा पुरवून, भारतीय कन्स्ट्रक्शन उद्योगक्षेत्रात सर्वोत्तम सुरक्षा मापदंड निर्माण करून टाटा प्रोजेक्ट्सने उद्योगक्षेत्रातील आघाडी कायम राखली आहे. विविधता आणि समावेशाप्रती आमची बांधिलकी आमच्या लीडरशिप टीममधून दिसून येते, आघाडीच्या डीअँडआयवर आमचे उद्योगक्षेत्र भर देत असल्याचे हे एक उदाहरण आहे. आमच्या प्रमुख कौशल्य विकास कार्यक्रमामार्फत कन्स्ट्रक्शनच्या भविष्याला आकार दिला जात आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे."
धोरण आणि वृद्धी: कंपनीने आपल्या प्राधान्य दिल्या जात असलेल्या क्षेत्रांमध्ये सिलेक्टिव्ह बिडिंग करण्याचे, लाभदायक वृद्धीला चालना देण्याचे, कॉम्प्लेक्स प्रकल्पांवर भर देण्याचे आणि अनुकूल बाजारपेठ स्थितीचा लाभ घेण्याचे धोरण कंपनीने कायम राखले आहे. नावीन्य आणि तंत्रज्ञानामार्फत, अंदाज लावण्यायोग्य व शाश्वत प्रकल्प करून देऊन ग्राहकांना आनंद मिळवून देण्यावर आमचा धोरणात्मक भर आहे. टाटा प्रोजेक्ट्स नवनवीन संधींचा लाभ घेऊन बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी सज्ज आहे.
तंत्रज्ञान व नावीन्य यांना चालना: उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या क्षमता आणि नावीन्य यांना चालना देण्यासाठी डिजिटल प्रोजेक्टवर आम्ही आमचा भर वाढवला आहे. त्यासाठी आणि मजबूत आयटी कोर उभारण्यासाठी आम्ही वर्षभरात सॅप ईआरपी मायग्रेट केले. फक्त ९ महिन्यात कार्यान्वित करण्यात आल्यामुळे हे ईपीसी सेक्टरमधील एक सर्वात वेगवान रोल आउट ठरले आहे. या वर्षभरात आम्ही अनेक तंत्रज्ञान भागीदारी केल्या आहेत आणि त्याद्वारे आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा पुरवल्या आहेत. या भागीदारींमुळे टाटा प्रोजेक्ट्सला बांधकामात पर्यावरणपूरकतेला चालना देता येईल आणि आपल्या प्रकल्पांचे कार्बन फूटप्रिंट कमी करता येईल.
नवभारताची उभारणी: गुजरातेतील मायक्रॉन सेमीकंडक्टर युनिट, चेन्नई मेट्रो लाईन आणि तामिळनाडूतील टाटा पॉवर सोलर प्लांट यांनी संपादन केलेले यश नवभारताच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञान उन्नती घडवून आणण्याची टाटा प्रोजेक्ट्सची बांधिलकी दर्शवते. हे आणि नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टसारखे इतर अनेक प्रकल्प त्यांचे गुंतागुंतीचे स्वरूप आणि प्रोजेक्ट डिलिव्हरीचे मर्यादित वेळेचे शेड्युल या बाबी एकीकृत प्रकल्प ठरलेल्या किमतीत आणि वेळेत पूर्ण करून देण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये आमच्या ग्राहकांनी दर्शविलेला विश्वास दाखवून देतात.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करून यशस्वीपणे सुपूर्द करण्यात आले. यामध्ये नवीन संसद भवन, अटल सेतू (एमटीएचएल), फर्स्ट सोलर आयएनसीसाठी सोलर मॅन्युफॅक्चरिंग युनिट, डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरचे अनेक शेकडो किलोमीटरचे बांधकाम आणि इसरोसाठी ट्रायसॉनिक विंड टनेल यांचा समावेश आहे. अशाप्रकारे टाटा प्रोजेक्ट्स नवभारताची उभारणी करण्यात मोलाचा हातभार लावत आहे.
मिआ बाय तनिष्कने अक्षय तृतीयेसाठी लॉन्च केले ‘ग्लो विथ फ्लो’ कलेक्शन
रकुल प्रीत सिंगचा प्रमोशनमध्ये सहभाग
मिआ बाय तनिष्कच्या ट्रेंडी दागिन्यांसह निसर्गाच्या नाजूक सौंदर्यामध्ये हरवून जा
मुंबई-: अक्षय तृतीया जवळ येत आहे आणि या निमित्ताने भारतातील सर्वात ट्रेंडी फाईन ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक, मिआ बाय तनिष्कने सादर केले आहे आपले नवे कलेक्शन 'ग्लो विथ फ्लो'. मिआचे हे नवे कलेक्शन निसर्गाच्या नाजूक सौंदर्यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे. ही डिझाइन्स नदीच्या प्रवाहासारखी आहेत, आशीर्वाद, नवी सुरुवात आणि समृद्धी दर्शवतात. हे कलेक्शन आयुष्यातील अमर्याद संभावनांचा सन्मान करते आणि अक्षय समृद्धीचे सार दर्शवते.
हवेच्या सौम्य लहरी आणि नदीच्या प्रवाहातील लय यांनी प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या 'ग्लो विथ फ्लो' कलेक्शनमधील प्रत्येक दागिना जीवनाच्या प्रवाहातील सद्भावनेचे प्रतीक आहे. २०० पेक्षा जास्त डिझाइन्ससह १४ आणि १८ कॅरेटचे सोने व चमचमत्या हिऱ्यांचे दागिने आधुनिक, सुबक आणि ट्रेंडी आहेत. कोणत्याही प्रसंगी सहजपणे स्टाईल करता यावेत यादृष्टीने डिझाईन करण्यात आले आहेत. यामध्ये स्टड्स, अंगठ्या, बांगड्या, झुमके, इयर कफ, पेंडंट आणि नेकवेयर सेट्स देखील आहेत. मिआने अक्षय तृतीयेसाठी विशेष ऑफर प्रस्तुत केल्या आहेत, यामध्ये ग्राहकांना ५००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिऱ्यांच्या उत्पादनांवर १ खरेदीवर ३%* ची सूट, २ खरेदीवर १०%* सूट आणि ३ खरेदीवर १५%* सूट मिळू शकते. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर सरसकट १०% ची सूट दिली जात आहे. याशिवाय ७५००० रुपयांपेक्षा जास्त बिलावर ग्राहकांना सरसकट १५% सूट* मिळेल. तनिष्कच्या सर्व रिटेल आउटलेट्स आणि ऑनलाईन चॅनेल्सवर १ ते १२ मे २०२४ पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल.
हवा आणि पाण्याच्या लहरींमधील सौंदर्य ल्यायलेली ही शानदार डिझाइन्स असीम क्षमता दर्शवतात. यामध्ये केशी मोत्यांनी सजलेले दागिने आहेत, मनमोहक चमक आणि आकर्षक डिझाइन्समध्ये जडवण्यात आलेले हिरे प्रसिद्ध आहेत. या कलेक्शनची प्रेरणा प्रतिबिंबित करणारे, स्लायडिंग पर्ल असलेले दागिने या कलेक्शनच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहेत. झऱ्यांची आठवण करून देणाऱ्या कानातल्यांपासून पानांमधून वाहणाऱ्या मंद हवेची शीळ ऐकवणाऱ्या नाजूक बांगड्या आणि चमकदार पिवळ्या सोन्यापासून बनवलेल्या अंगठ्या आनंदाने भरलेल्या जीवनाची प्रतीके आहेत. कलेक्शनमधील प्रत्येक दागिना उत्साहपूर्ण स्वप्ने व जीवनातील अमर्याद क्षमता दर्शवतो.
मिआच्या दुनियेत तुमचे स्वागत आहे, याठिकाणी प्रत्येक दागिना आनंद आणि सौंदर्याची कथा सांगतो. लग्नासारख्या शुभ प्रसंगी भेट म्हणून देण्यासाठी हे दागिने उत्तम आहेत. एखाद्या महत्त्वाच्या यशाचा आनंद साजरा करणे असो किंवा ही अक्षय तृतीया संस्मरणीय बनावी अशी इच्छा असो, मिआचे दागिने तुमच्या भावना दर्शवतात.
कलेक्शनबद्दल मिआ बाय तनिष्कच्या बिझनेस हेड श्रीमती श्यामला रमणन यांनी सांगितले, "यंदाच्या अक्षय तृतीयेला मिआचे 'ग्लो विथ फ्लो' कलेक्शन लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. 'ग्लो विथ फ्लो' चे दागिने खास इन-हाऊस डिझाईन करण्यात आले आहेत. हे दागिने नदीचा प्रवाहा आणि त्याच्या विविध मूड्सपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहेत - जिवंत, शांत, लयबद्ध नदी जिथे वाहते तिथे जीवन आणि समृद्धीचा संचार होतो.
हिरे पाण्यावर सूर्याची चमक आणि केशी मोती पाण्यावर चांदण्याची चमक दर्शवतात. प्रत्येक डिझाईन आधुनिक आणि कालातीत आहे. थोडे थांबून, आत्मविश्वासासह जीवनाची वाटचाल आशा व आत्मविश्वासाने पुढे नेण्याची आठवण करून देतात.
मिआच्या टीमकडून तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा."
'ग्लो विथ फ्लो' हे केवळ दागिन्यांचे कलेक्शन नाही तर उत्साही स्वप्ने व जीवनातील विपुल संधींचा आनंद आहे. प्रत्येक दागिना व्यक्तीचा आंतरिक प्रकाश दर्शवतो.
या, मिआच्या 'ग्लो विथ फ्लो' कलेक्शनसह जीवनातील अंतहीन प्रवाहातील जादूचा आनंद घ्या. सर्व मिआ स्टोर्स, निवडक तनिष्क स्टोर्स आणि मिआची होमसाईट https://www.miabytanishq.com/ व ऍप्लिकेशनसहित अनेक ऑनलाईन चॅनेल्सवर हे कलेक्शन उपलब्ध आहे.
मनोज वाजपेयी यांचा नंद घर मोहिमेत सहभाग
· ७ कोटी मुले आणि २ कोटी महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने नंद घर हा सामाजिक प्रभाव प्रकल्प राबवला जातो.
· सर्व मुलांना दर्जेदार पोषण मिळावे...
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स पुण्यामध्ये २ मे आणि ३ मे २०२४ हे दोन दिवस वॉक-इन रिक्रुटमेंट मोहीम आयोजित करणार
पुणे: भारतामध्ये एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स बनवणारी एक आघाडीची खाजगी कंपनी टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने पुण्यामध्ये २ मे आणि ३ मे २०२४ रोजी पिंपरीतील हॉटेल कॅरिअडमध्ये वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. टीएएसएलच्या हैद्राबाद आणि नागपूर फॅसिलिटीमधील जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या हैद्राबाद आणि पुणे फॅसिलिटीमध्ये एनसी प्रोग्रामरची भरती करू इच्छित असून, उमेदवारांनी कॅड/कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि त्यांच्याकडे ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला आपल्या हैद्राबाद फॅसिलिटीसाठी ऑपरेटर असेम्ब्ली आणि पेंटरच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांना ३ ते ६ वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहेत.
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या हैद्राबाद आणि पुणे फॅसिलिटीमध्ये एनसी प्रोग्रामरची भरती करू इच्छित असून, उमेदवारांनी कॅड/कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि त्यांच्याकडे ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला आपल्या हैद्राबाद फॅसिलिटीसाठी ऑपरेटर असेम्ब्ली आणि पेंटरच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांना ३ ते ६ वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहेत.
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देते. सर्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याधुनिक सेवासुविधा उत्पादने विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या ज्ञान व अनुभवाचा वापर करता यावा यासाठी पूरक वातावरण पुरवण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे.
जागतिक पातळीवरील आघाडीच्या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपन्यांसोबत भागीदारी करून टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आंतरराष्ट्रीय पुरवठा शृंखलेतील एक अविभाज्य सहयोगी आहे. आघाडीच्या डिफेन्स ओईएम कंपन्यांसाठी ही कंपनी ग्लोबल सिंगल सोर्स प्रोव्हायडर आहे.
एनडीआर वेअरहाऊसिंगतर्फे पुण्यात अत्याधुनिक सुविधेचे अनावरण
· या सुविधा केंद्रात गोदामाची जागा 0.४ दशलक्ष चौ. फूट आहे
· ७ महिन्यांत बांधकाम पूर्ण
पुणे, २५ एप्रिल २०२४: गोदाम आणि दळणवळण क्षेत्रातील आघाडीची कंपनी एनडीआर वेअरहाऊसिंगने आज पुण्यात...
