Industrialist

टाटा ऍसेट मॅनेजमेंटने भारतातील पहिला टुरिजम इंडेक्स फंड लॉन्च केला

मुंबई,: म्युच्युअल फंड उद्योगातील आघाडीच्या टाटा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने देशातील पहिला टुरिजम इंडेक्स फंड लॉन्च केला आहे. यामध्ये निफ्टी ५०० चा भाग असलेल्या काही कंपन्या सामील आहेत. टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंड निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्सला (टीआरआय म्हणजे टोटल रिटर्न इंडेक्स) ट्रॅक करेल.   हा एक ओपन एंडेड इंडेक्स फंड आहे. गुंतवणूकदारांना प्रवास, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायांमध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या भारतातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी देण्यासाठी हा फंड अतिशय काळजीपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे. इंडेक्समधील कंपन्या आपापल्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. वाढते डिस्पोजेबल उत्पन्न, भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडींमध्ये होत असलेले बदल आणि डिस्क्रिशनरी खर्चांमध्ये होत असलेली वाढ यामुळे त्यांना अनेक लाभ मिळत आहेत. इंडेक्स फंडच्या लॉन्च प्रसंगी, टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री आनंद वरदराजन यांनी सांगितले, "वाढते डिस्पोजेबल उत्पन्न, पायाभूत सोयीसुविधांचा विकास जसे की, उत्तम हायवे कनेक्टिव्हिटी, अधिक चांगल्या व वेगवान रेल्वे सुविधा व नवीन विमानतळांनी प्रवास करणे अधिक सोपे, वेगवान आणि सुरक्षित केले आहे. देशांतर्गत विमान प्रवास सुविधा, हॉटेल्स, रेस्टोरंट आणि प्रवासामध्ये वेगाने वाढ होत आहे, पर्यटन क्षेत्रासाठी हा अतिशय चांगला संकेत आहे. सर्व प्रकारच्या प्रवासांमध्ये वाढ होत आहे, मग तीर्थयात्रा असो, व्यवसायासाठी, वैद्यकीय कारणांसाठी असो किंवा सुट्टीसाठी असो. त्यामुळे पर्यटन हे एक क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे आणि या क्षेत्राच्या विकासाचे लाभ मिळवण्यासाठी यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे." टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंडची सुरुवात अशा वेळी झाली आहे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था मजबूत गुंतवणूक व उपभोगामुळे उल्लेखनीय लवचिकता दर्शवत आहे. भारतामध्ये मध्यमवर्गामध्ये वाढ होत असल्याने इच्छा-आकांक्षा म्हणून, अनुभव मिळावेत म्हणून केल्या जाणाऱ्या प्रवासांत वाढ होत आहे, पायाभूत सोयीसुविधांमध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळत आहे, हवाईमार्ग क्षमतांचा विस्तार होत आहे, त्यामुळे प्रवास करणे अधिक सहजसुलभ बनले आहे. त्याखेरीज तंत्रज्ञानामध्ये प्रगतीमुळे ऑनलाईन रेस्टोरंट ऍग्रीगेटर्स आणि वाढत्या डिलिव्हरी अर्थव्यवस्थेबरोबरीनेच प्रवास व रेस्टोरंट क्षेत्रात क्रांती घडून आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वेगवेगळी ठिकाणे व अनुभवांची ओळख करून देत आहेत, त्यामुळे प्रवास करण्याच्या इच्छेला प्रोत्साहन मिळत आहे. श्री. वरदराजन यांनी सांगितले, "परिणामी, भारताचा प्रवास आणि पर्यटनावरील खर्च २०१९ मध्ये १४० बिलियन डॉलर्सवरून २०३० पर्यंत ४०६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याचे अनुमान आहे. (स्रोत: युरोमॉनिटर, सिस्टमॅट्रिक्स इन्स्टिट्यूशनल रिसर्च)" इंडेक्स पद्धत: टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंडमध्ये सध्या १७ स्टॉक आहेत. (२१ जून २०२४ पर्यंत) त्याच्या इंडेक्स पद्धतीमध्ये पर्यटनाशी संबंधित सर्व सेगमेंट्सचे जास्तीत जास्त प्रतिनिधित्व व्हावे यासाठी काटेकोर मापदंडांचे पालन केले जाते. इंडेक्समध्ये कमाल स्टॉक स्तराची सीमा २०% आहे. या इंडेक्समध्ये मूळ इंडेक्स निफ्टी ५०० मधून जास्तीत जास्त ३० स्टॉक असू शकतात. वैविध्य आणि जोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करत, इंडेक्स घटकांना फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायजेशनच्या आधारे भारित केले जाते.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजने पंढरपूर वारी यात्रेला पाठिंबा देण्याची दीर्घकालीन परंपरा २०२४ मध्येही ठेवली सुरू

भक्तांसाठी वैद्यकीय शिबिरे उभारून मुकुल माधव फाउंडेशन (MMF) करत आहे मदत पुणे-- फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही पीव्हीसी पाइप्स आणि फिटिंग्जसाठीची भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी आहे. कंपनीने २०२४ च्या पंढरपूर वारी यात्रेत आपला सहभाग कायम ठेवण्याची अभिमानाने घोषणा केली असून, 25 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळ्याला कंपनीने कायम पाठिंबा दिला आहे. पंढरपूर वारीला ८०० वर्ष जुनी परंपरा आहे. लाखो भाविक पंढरपूरच्या विठोबा मंदिरात पायी २१ दिवसांची यात्रा करतात. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी चालू असलेल्या संकल्पाचा एक भाग म्हणून, फिनोलेक्सने २०२४ च्या वारी यात्रेसाठी सर्वसमावेशक सहायक कार्यक्रम आखला. फिनोलेक्सने वारकऱ्यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासादरम्यान यात्रेकरूंच्या सोईत वाढ करण्यासाठी आवश्यक वस्तू पुरविल्या. यामध्ये वैयक्तिक सामान वाहून नेण्यासाठी मोठ्या उपयुक्त पिशव्या, अनपेक्षित हवामानापासून संरक्षण करण्यासाठी पोंचो आणि भक्तीमार्गात मदत करण्यासाठी हरिपाठ पुस्तिका यांचा समावेश होता. या भव्य सोहळ्याच्या व्यवस्थापनात कायद्याच्या अंमलबजावणीची महत्त्वाची भूमिका ओळखून कंपनीने कार्यक्रमाची देखरेख करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना रेनकोटचे वाटपही केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या यात्रेदरम्यान आरोग्यसेवेला प्राधान्य होते. यावर उपाय म्हणून फिनोलेक्सची सीएसआर शाखा, मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ)ने यात्रा मार्गावरील प्रमुख ठिकाणी अनेक वैद्यकीय शिबिरे उभारली. या शिबिरांमध्ये वारकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात आरोग्याची काळजी घेऊन आवश्यक वैद्यकीय साहाय्य देण्यात आले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.चे विक्री आणि विपणन अध्यक्ष श्री. प्रदीप शास्त्री वेदुला म्हणाले, "पंढरपूर वारीतील आमचा सहभाग हा फिनोलेक्सच्या महाराष्ट्रातील कृषी समुदायाशी असलेल्या नात्याचा पुरावा आहे. २५ वर्षांहून अधिक काळ आम्हाला या सोहळ्याला पाठिंबा देण्याचा मान मिळाला आहे. ८०० वर्षांची परंपरा जी लाखो लोकांना भक्ती आणि एकतेच्या भावनेने एकत्र आणते, ती आम्हाला 'वारकरी सेवे'मध्ये सहभागी करून घेण्यास अनुमती देते, जी आमच्यासाठी सामाजिक कार्य आणि विठ्ठलाला वंदन करण्यासारखीच आहे. आम्हाला अशा परंपरेत सहभागी होण्याची ही संधी आहे, जी सर्व सामाजिक स्तरातील लोकांना एकत्र आणते. आम्ही ज्या लोकांची सेवा करतो, त्यांच्याशी असलेली आमची वचनबद्धता ही वारीमधील आमच्या सहभागातून दिसून येते." फिनोलेक्सचा या उपक्रमातून सेवा देत असतानाच, परंपरा टिकवून ठेवण्याचा संकल्प प्रतिबिंबित होतो. महाराष्ट्रात खोलवर रुजलेली कंपनी आणि कृषी क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी म्हणून फिनोलेक्सने वारीला आपले ग्राहक बंध मजबूत करण्याची आणि या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमात अर्थपूर्ण योगदान देण्याची संधी म्हणून पाहिले आहे.

परदेशातील पदव्युत्तर अभ्यासासाठी यंदा 90 विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती

3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख; 55 जणांना प्रत्येकी 5 लाख आणि 32 जणांना प्रत्येकी 1 लाख अशी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. मुंबई, १७ जुलै, २०२४ : के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट (KCMET) ने के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत 90 हुशार, चुणचुणीत विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली. परदेशात पदव्युत्तर अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल. दिवंगत के.सी. महिंद्रा यांनी 1953 मध्ये या शिष्यवृत्तीस सुरुवात केली. महिंद्रा ट्रस्टमार्फत दिली जाणारी ही शिष्यवृत्ती म्हणजे व्याजमुक्त कर्ज आहे. उत्कृष्ट शैक्षणिक आणि अभ्यासेतर गोष्टींमध्ये आघाडीवर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ती दिली जाते. शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतील. यात राज पटेल, अस्मिता सूद आणि सावली टिकले यांचा समावेश आहे. राज पटेल प्रिन्स्टन विद्यापीठात फायनान्सचा अभ्यास करणार आहेत; अस्मिता सूद स्टॅनफोर्ड विद्यापीठात बायोमेडिकल डेटा सायन्स शिकणार आहे आणि सावली टिकले हार्वर्ड विद्यापीठात आर्किटेक्चर अभ्यासणार आहे. 55 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 लाख आणि 32 विद्यार्थ्यांना त्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या वर्षीच्या गटातील अपवादात्मक गुणवत्ता आणि प्रतिभा हेरत ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच, मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे. ट्रस्टकडे यंदा एकूण 2,354 अर्ज आले होते. यापैकी 90 विद्यार्थ्यांची दोन दिवस मुलाखत घेण्यात आली. या निवड समितीमध्ये महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, रंजन पंत, महिंद्रा अँड महिंद्राचे बोर्ड सदस्य, महिंद्रा समूहाच्या मुख्य माहिती अधिकारी ऋचा नानावटी, केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त भरत दोशी, उल्हास यरगोप आणि ATLAS स्किलटेक विद्यापीठाच्या अध्यक्ष आणि कुलपती डॉ. इंदू शहानी यांचा समावेश होता. निवडलेल्या उमेदवारांमध्ये 29 IIT पदवीधरांचा समावेश होता, तर बाकीचे SRCC, LSR, कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्युट फॉर आर्किटेक्चर अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीज, NITs, BITS पिलानी आणि नॅशनल लॉ स्कूल यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी होते. या उमेदवारांना परदेशातील सर्वोच्च विद्यापीठ, तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. यामध्ये हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथे प्रत्येकी 13, कार्नेगी मेलॉन येथे 8, ऑक्सफर्ड आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात प्रत्येकी 6, कोलंबिया आणि एमआयटी येथे प्रत्येकी 5, येल, शिकागो विद्यापीठ, जॉन हॉपकिन्स आणि केंब्रिज येथे प्रत्येकी 3, प्रिन्स्टन, जॉर्जिया टेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे प्रत्येकी 2, अशी विद्यार्थ्यांची विभागणी झाली आहे. शिष्यवृत्तीबद्दल बोलताना, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “केसीएमईटी पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज ॲब्रॉड स्कॉलरशिपच्या माध्यमातून भारतातील काही हुशार आणि चुणचुणीत तरुणांसोबत गप्पा मारण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा हा एक समृद्ध अनुभव आहे. या संधीची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!” के.सी. महिंद्रा शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी कृपया www.kcmet.org ला भेट द्या.

रिअल इस्टेटमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी गोदरेज प्रॉपर्टीजने C.R.E.W चा पुणे अध्याय केला सुरू

●  C.R.E.W, कलेक्टिव्ह ऑफ रिअल इस्टेट वुमन हा देशव्यापी उपक्रम आहे. ●  आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर 670+ पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी झाली आहे. पुणे, १७ जुलै २०२४ : भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने कलेक्टिव्ह ऑफ रिअल इस्टेट वुमन(C.R.E.W)साठी पुणे चॅप्टर सुरू केला. रिअल इस्टेट, बांधकाम आणि संबंधित क्षेत्रातील महिला व्यावसायिकांना सक्षम करणे हा या देशव्यापी उपक्रमाचा उद्देश आहे. गोदरेज प्रॉपर्टीज नेहमीच विविधता आणि सर्वसमावेशकतेत आघाडीवर राहिली आहे, कंपनीने 31% महिला, LGBTQ, आणि PWD कर्मचाऱ्यांचे 32% प्रतिनिधित्व दाखविले आहे आणि 32% महिलांचे प्रतिनिधित्व FY24 साठी पुण्यात दिसून आले आहे. प्रोजेक्ट वुल्फ हा कार्यक्रमाच्या प्रमुख घटकांपैकी एक अंतर्गत अभ्यास आहे, ज्यामध्ये ५००+ पेक्षा जास्त महिलांना सहभागी करून घेण्यात आले आहे, उदासीनता आणि प्रतिबद्धता डेटाचे विश्लेषण करणे आणि कार्यात्मक आणि भावनिक गरजांवर आधारित लक्ष्यित उपाय विकसित करणे, हा याचा उद्देश आहे. एका महत्त्वाच्या शोधातून असे दिसून आले आहे की, महिला कर्मचाऱ्यांच्या भावनिक गरजा कामाच्या ठिकाणी त्यांच्या कार्यात्मक आवश्यकतांपेक्षा जास्त आहेत, त्यातून एक सहायक आणि सहानुभूतीपूर्ण कामाचे वातावरण तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. C.R.E.W ची कल्पना एक सर्वांगीण दृष्टिकोन म्हणून केली जाते, त्यात केवळ संख्या मोजली जात नाही. एक असे वातावरण तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते, जिथे महिला कार्यात्मक आणि भावनिक दोन्ही गरजा पूर्ण करून खऱ्या अर्थाने भरभराट करू शकतात. हा उपक्रम केवळ गोदरेज प्रॉपर्टीजपुरता मर्यादित नाही, तर रिअल इस्टेट क्षेत्राला लैंगिक विविधतेला प्राधान्य देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी एक राष्ट्रीय चळवळ म्हणून त्याची कल्पना आहे. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या सीएचआरओ मेघा गोयल म्हणाल्या, “आम्ही या क्षेत्रात केलेली कामे आणि आमचे ध्येय यामध्ये हा फोरम सुरू करण्यामागील उद्देश दडलेला आहे. आम्ही पुढील काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्व महिलांचा भरभराटीचा समूह म्हणून CREW तयार करण्यास उत्सुक आहोत, विशेषत: बांधकाम क्षेत्रात, जे खास करून महिलांसाठी सर्वात आकर्षक क्षेत्र नाही. आमच्या अंतर्गत अभ्यास 'प्रोजेक्ट वुल्फ'मधील डेटानुसार महिला प्रतिनिधित्व आणि समावेशासाठी डेटा-आधारित माहिती तयार करण्यात मदत करण्यासाठी आश्वासक आणि सहानुभूतीपूर्ण कामाचे वातावरण तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. या लाँच इव्हेंटला प्रभावशाली नेते आणि व्यावसायिक एकत्र आले. लैंगिक विविधता आणि उद्योगात समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून याकडे पाहिले पाहिजे. यात पॅनेल चर्चा, परस्परसंवादी कार्यशाळा आणि नेटवर्किंगच्या संधी होत्या. "रिअल इस्टेटमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या संधीचा शोध" या शीर्षकाच्या पॅनेल चर्चेत डॉ. सुषमा कुलकर्णी, NICMAR विद्यापीठ, पुणेच्या कुलगुरू, सुश्री गायत्री वासुदेवन, समभाव फाउंडेशनच्या मुख्य प्रभाव अधिकारी, सुश्री हेमामालिनी उपूर, नीना पर्सेप्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या सीईओ आणि सुश्री अकिला जयरामन, गोदरेज प्रॉपर्टीजच्या क्षेत्र प्रमुख यांचा समावेश होता. त्यांनी सर्वसमावेशक कार्यस्थळांना चालना देण्यासाठी, स्टिरियोटाइपला आव्हान देणारी आणि रिअल इस्टेटमधील महिलांसाठी मार्गदर्शन व लक्ष्यित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे समोर मांडली. C.R.E.W चे उपक्रम भारताच्या अनन्यसाधारण सांस्कृतिक आणि व्यावसायिक संदर्भानुसार तयार केले गेले आहेत. जे जेंडर नॉर्म्स आणि प्रासंगिकता व परिणामकारकतेसाठी परिणामकारक आहेत. प्लॅटफॉर्म लवचिकता धोरणे, कार्य-जीवन संतुलन आणि करिअर वाढीस प्रोत्साहन देते, ज्यामुळे संस्कृतीत बदल घडवून आणण्यासाठी व कर्मचाऱ्यांना सर्व स्तरांवर गुंतवून ठेवता येते. सर्वसमावेशक कार्यक्षेत्रासाठी गोदरेज प्रॉपर्टीजची वचनबद्धता C.R.E.W ला चालना देते, ज्यामुळे सर्जनशीलता, नावीन्यता आणि व्यावसायिक कामगिरी वाढते. C.R.E.W रिअल इस्टेटमधील स्त्रियांच्या कमी प्रतिनिधित्वाला संबोधित करते, त्यांच्या प्रतिभेचा फायदा घेऊन या क्षेत्रातील वाढ आणि उत्कृष्टता आणण्यासाठी प्रत्येक जण समृद्ध होऊ शकेल, असे वातावरण तयार करते.

किरण बेदींद्वारे सेफ्टी अलार्मसह एव्हरेडीच्या सायरन टॉर्चचे अनावरण

महिला सुरक्षेला बळकट बनविणारा एक नवोपक्रम- एव्हरेडीचा सायरन टॉर्च हे एक अनोखे आणि क्रांतिकारी उत्पादन आहे. हा टॉर्च सुरू कराल, तेव्हा त्याला जोडून असलेली साखळी खेचल्यावर एक 100dbA क्षमतेच्या सुरक्षा अलार्मचा आवाज होईल, ज्यामुळे संकटकाळात मदत मागण्यासोबतच आसपासच्या लोकांना सावध करता येते. https://www.youtube.com/watch?v=6mRanjeL2n8&t=2s - एव्हरेडीच्या या नवीन सायरन टॉर्चबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी #AwaazUthaneyKaPower ही मोहीम कर्णबधिर आणि मूक महिलांद्वारे चालविली जाते. या मोहिमेचे उद्दिष्ट महिलांना, तसेच अन्य लोकांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि सुरक्षा साधनांसह सक्षम करणे, तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करणे, हे आहे. मुंबई, १६ जुलै २०२४: शक्ती, कामगिरी आणि विश्वासार्हतेचा समानार्थी असलेला भारताचा नंबर 1 बॅटरी ब्रँड एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लि. (EIIL) यांनी भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते सुरक्षा अलार्मसह फ्लॅशलाइट - एव्हरेडी सायरन टॉर्चचे उद्घाटन केले. मार्केटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या या अनोख्या सायरन फ्लॅशलाइटला 100dbA आवाजाचा सुरक्षा अलार्म आहे. याला लागून असलेली चेन खेचली जाते, तेव्हा हा अलार्म वाजतो. महिला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेल्या या नवीन लाँच केलेल्या सायरन फ्लॅशलाइटचे उद्दिष्ट दैनंदिन जीवनातील सुरक्षा वाढविणे आहे. या नावीन्यपूर्ण उत्पादनाला ब्रँडच्या #AwaazUthaneyKaPower या नवीन मोहिमेचे पाठबळ आहे, ज्याचे नेतृत्व कर्णबधिर आणि मूक लोकांकडून केले जाते. सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या उत्पादनाची आवश्यकता अधोरेखित केली जाते.#AwaazUthaneyKaPower मोहिमेसाठी एव्हरेडीने भारतातील कर्णबधिर समुदायाला भेडसावणाऱ्या "ॲक्सेसिबिलिटी"शी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत संस्था India Signing...

Popular