Industrialist

अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

पुणे-आपल्या ग्राहकांना एकात्मिक सुविधा व्यवस्थापन ("आयएफएम") सेवा आणि व्यवसाय पाठबळ सेवा ("बीएसएस") सादर करत संपूर्ण भारतात स्थान निर्माण केलेल्या भारतातील एक अग्रगण्य, केंद्रित आणि एकात्मिक व्यवसाय सेवा...

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे OBD2 चे पालन करणारी 2023 एसपी125 लाँच

नवी दिल्ली, ३१ मार्च २०२३ – ग्राहकांच्या आनंदासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज OBD2 चे पालन करणारी 2023 एसपी125 लाँच केली आहे. 2023 एसपी...

महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे तळेगाव येथे एक दशलक्ष चौरस फुट जागेत वेयरहाउस पार्क लाँच करत असल्याची घोषणा

०.५ दशलक्ष चौरस फुटांचा पहिला टप्पा २०२३-२४ च्या अखेरपर्यंत कार्यान्वित होणार पुणे- महिंद्रा लॉजिस्टिक्स लि(एमएलएल) या भारतातील सर्वात मोठ्या सर्वसमावेशक लॉजिस्टिक्स सुविधा पुरवठादार कंपनीने तळेगाव पुणे येथे एक दशलक्ष चौरस फुट जागेत मल्टी- क्लाएंट वेयरहाउस पार्क उभारत असल्याची घोषणा केली आहे. हे वेयरहाउस एमएमएलच्या पॅन भारतातील धोरणात्मक औद्योगिक केंद्रांत होत असलेल्या मल्टी- युजर सुविधा नेटवर्कचा महत्त्वाचा भाग असेल. एक दशलक्ष चौरस फुटांच्या दर्जेदार वेयरहाउसिंग क्षमतेबरोबरच इथे एमएलएमलचे पहिले स्वयंचलित तंत्रज्ञान केंद्रही उभारण्यात येणार आहे. चाकण तळेगाव इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (सीटीआयसी) येथे उभारले जाणार असलेले हे आधुनिक आणि दर्जेदार वेयरहाउस कंपनीच्या शाश्वततेशी संबंधित नियमांनुसार बांधले जाणार आहे. ते उभारताना रिसायकल केलेले बांधकामाचे साहित्य, सांडपाण्याचे व्यव्सथापन, अक्षय उर्जा, कचरा व्यवस्थापन आणि आधुनिक स्वयंचलनावर भर दिला जाणार आहे. शाश्वततेप्रती असलेली एमएलएलच्या बांधिलकीमुळे वेयरहाउसिंग सुविधा उर्जा कार्यक्षम असेल याची खात्री केली जाते तसेच आपल्या सर्व मल्टी- क्लाएंट, भव्य वेयरहाउसचे बांधकाम इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) प्लॅटिनम सर्टिफिकेशन तसेच लीडरशीप इन एनर्जी अँड एन्व्हॉरमेंटल डिझाइन (एलईईडी) सर्टिफिकेशन साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. नवे वेयरहाइस आयजीबीसी गोल्ड/प्लॅटिनम प्रमाणित असेल व त्यामध्ये १०० टक्के सौर उर्जा अक्षय उर्जा वापरली जाईल. सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटीमुळे संपूर्ण विकास तीन टप्प्यांत केला जाणार असून ०.५ दशलक्ष चौरस फुटांचा पहिला टप्पा २०२३-२४ च्या अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे. या वेयरहाउसमध्ये एमएलएलचे पहिले स्वयंचलित तंत्रज्ञान केंद्रही उभारले जाणार आहे. हे केंद्र कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, एआरव्हीआर, एजीव्हीज आणि ब्लॉक चेन अशा स्वयंचलित तंत्रज्ञानाचा विकास तसेच वापरावर भर देईल. महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘चाकण परिसरात भारतातील आघाडीचे औदयोगिक आणि उपभोक्ता क्लस्टर वसलेले आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्ससाठी हा सर्वात मोठा परिसर आहे आणि असेंडस फर्स्टपेस यांच्यासह भागिदारीत येथे गुंतवणूक करताना आम्हाला आंद होत आहे. या एक दशलक्ष चौरस फुटांच्या वेयरहाउसमुळए आम्हाला या परिसरातील महत्त्वाच्या ग्राहकांसाठी सर्वसमावेशक सुविधांची श्रेणी आणखी विस्तारता येईल व दर्जेदार आणि तंत्रज्ञानावर आधारित सुविधा पुरवता येतील. या ठिकाणी आमचे पहिले स्वयंचलित तंत्रज्ञान केंद्र उभारले जाईल तसेच डीईआयए गुणवत्ता विकासावर भर दिला जाईल. आयजीबीसी/एलईईडी प्रमाणित आणि २०४० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या वेयरहाउसची उभारणी केली जाईल.’

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे OBD2 चे पालन करणारी 2023 अ‍ॅक्टिव्हा125 लाँच

नवी दिल्ली, २८ मार्च २०२३ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज OBD2 चे पालन करणारी नवी 2023 अ‍ॅक्टिव्हा125 लाँच केली. 2023 अ‍ॅक्टिव्हा125 लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष...

एल अँड टी – सुफिनने बांधकाम साहित्याच्या डिजिटल खरेदीसाठी CREDAI-MCHI सोबत केला सामंजस्य करार

मुंबई, २४ मार्च २०२३: लार्सन अँड टुब्रो (L&T) द्वारे समर्थित औद्योगिक उत्पादने आणि सेवांच्या खरेदी आणि विक्रीसाठी एकात्मिक व्यासपीठ असलेल्या एल अँड टी – सुफिनने...

Popular