Industrialist
मेडीबडी आणि आदित्य बिर्ला फायनान्सने हाऊसिंग फायनान्स ग्राहकांसाठी सुरु केला एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन
पुणे- 27 नोव्हेंबर, 2023: भारतातील सर्वात मोठा डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्म, मेडीबडी आणि हाऊसिंग फायनान्समधील एक आघाडीची कंपनी, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने एकत्र मिळून एबीएचएफएलच्या ग्राहकांसाठी एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन सुरु केला आहे. मेडीबडीच्या एका विशेष प्लॅनमार्फत ग्राहकांना परवडण्याजोग्या आणि सहज उपलब्ध होऊ शकतील अशा आरोग्य देखभाल सेवा प्रस्तुत करणे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे.
मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स यांच्या दरम्यानच्या सहयोगाने एक अफिनिटी पार्टनरशिप स्थापित केली आहे. या फ्रेमवर्कमध्ये एबीएचएफएलच्या ग्राहकांना पोर्टलवर साइन इन केल्यावर या विशेष प्लॅनचे लाभ मिळवता येतील. एबीएचएफएलच्या गृहकर्ज सेवांव्यतिरिक्त हा अजून एक अतिरिक्त लाभ ग्राहकांना मिळेल. मेडीबडी खूपच कमी किमतीत, फक्त २९९ रुपयांमध्ये, आरोग्य देखभालीच्या विशेष सेवा प्रदान करेल, ज्यामध्ये ओपीडी, लॅब टेस्ट्समध्ये १००० रुपयांचे लाभ, हेल्थ पॅकेजेस आणि फार्मसीवर होणाऱ्या खर्चावर ५०० रुपयांची सूट यांचा समावेश आहे. मेडीबडी एबीएचएफएलचे एकमेव आणि विशेष हेल्थकेयर पार्टनर आहेत. मेडीबडी प्लॅन सर्व एबीएचएफएल ग्राहकांना त्यांच्या पोर्टलवर एक डिफॉल्ट ऑफरिंग म्हणून अतिशय सहजपणे उपलब्ध करवून दिला जाईल. या भागीदारीच्या अटी व शर्ती एबीएचएफएलच्या ग्राहकांची सुविधा डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत.
या भागीदारीबद्दल मेडीबडीचे सह-संस्थापक व सीईओ श्री सतीश कन्नन यांनी सांगितले, "आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्ससोबत आमच्या भागीदारीने आम्हाला त्यांच्या ग्राहकांना आमचे अनोखे हेल्थकेयर लाभ प्रदान करण्यासाठी सक्षम बनवले आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सेवा अजून अनेक ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊ इच्छितो, त्यांना परवडण्याजोग्या दरामध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा देऊ इच्छितो. ही भागीदारी मेडीबडीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, आघाडीच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीसोबत हे आमचे पहिले व्हेंचर आहे. आम्हाला खात्री आहे की, ही भागीदारी दोन्ही कंपन्यांसाठी लाभदायक ठरेल."
भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा मिळू शकत नाहीत, त्यामुळे गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सेवांदरम्यान खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. या विशेष प्लॅनसह, मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स परवडण्याजोग्या आरोग्य देखभाल सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधील आहेत. खासकरून ज्यांना महागड्या प्राथमिक आरोग्य देखभाल सेवा सहजपणे मिळू शकत नाहीत अशा ग्राहकांपर्यंत आपल्या सेवा पोहोचवणे त्यांचे उद्दिष्ट आहे.
महिंद्राने ऍग्रोव्हिजन नागपूर येथे CNG ट्रॅक्टरचे अनावरण केले
नागपूर, 27 नोव्हेंबर 2023: भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर ब्रँड, महिंद्रा ट्रॅक्टर्सने त्याच्या लोकप्रिय युवो ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर, नागपूर येथील ऍग्रोव्हिजन येथे आपल्या पहिल्या CNG मोनो इंधन ट्रॅक्टरचे अनावरण केले. मध्य भारतातील सर्वात मोठा...
“न्यायालय अवमान प्रकरणी उद्योजकाला एक कोटींचा दंड !”
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी पिंपरीतील फिनोलेक्स कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दीपक छाब्रिया यांना तब्बल एक कोटी रुपयाचा दंड नुकताच ठोठावण्यात...
महिला स्टार्ट-अप्सना समर्थन देण्यासाठी बिट्स पिलानी व आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांचा नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मशी सहयोग
नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालानुसार, भारतात ६.३ कोटी इतके सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत. त्यांपैकी सुमारे २० टक्के उद्योग महिलांच्या मालकीचे आहेत आणि त्यांतून सुमारे २.२ ते २.७ कोटी लोकांना रोजगार मिळतो. एका अंदाजानुसार, महिलांच्या उद्योजकतेला गती दिल्यास, भारतात महिलांच्या मालकीचे आणखी तीन कोटींहून अधिक उद्योग निर्माण होऊ शकतात आणि त्यांमधून सुमारे १५ ते १७ कोटी जणांना नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.
~ ईशान्येकडील राज्ये, राजस्थान, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये ‘भारत १.० साठी महिला नवउद्योजक’ हा स्टार्ट-अप उपक्रम सुरू ~
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : 'पिलानी इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सोसायटी' या 'बिट्स पिलानी'च्या 'टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर'ने महिला उद्योजक मंचाच्या (विमेन एंटरप्रेन्योर प्लॅटफॉर्मच्या - डब्ल्यूईपी) संयुक्त विद्यमाने 'वुमनप्रेन्योर फॉर भारत १.०' (भारत १.० साठी महिला नवउद्योजक)हा स्टार्ट-अप उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा उपक्रम नीती आयोगाशी संबंधित आहे आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या सीएसआर विभागाने याकरीता सहकार्य केले आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी धोरणात्मक दिशा ठरविणारी आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन ही सर्वोच्च संस्था आहे. राजश्री बिर्ला या फाउंडेशनच्या मार्गदर्शक आहेत, तसेच विशाखा मुळ्ये, डॉ. प्रज्ञा राम आणि सुभ्रो भादुरी हे फाउंडेशनचे संचालक आहेत.
अरुणाचल प्रदेशातील इटानगरमधील 'दोरजी खांडू स्टेट कन्व्हेन्शन सेंटर' येथे २४ नोव्हेंबर रोजी 'उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखाली विकास साधणे' या विषयावर राज्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तीत या भागीदारीची घोषणा करण्यात आली. ही कार्यशाळा नीती आयोगाच्या राज्यांना मदत या अभियानाच्या अंतर्गत आणि अरुणाचल प्रदेश सरकार व महिला उद्योजक मंच यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आली होती. विविध व्यवसाय, सरकार आणि नागरी समाजामध्ये नवकल्पना, उद्योजकता आणि सर्वसमावेशक विकास यांच्या परिसंस्था एकत्र आणून महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योजकतेद्वारे विकास साधणे या विषयावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
ईशान्येकडील राज्ये, राजस्थान, हरयाणा आणि जम्मू-काश्मीर या प्रदेशांतील मध्यम व लहान शहरांसाठी काम करणाऱ्या किंवा खुद्द तेथील स्थानिक महिला उद्योजकांना निधी आणि इतर मदत पुरविणे हे 'वुमनप्रेन्योर फॉर भारत १.०' या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. 'यूएन-एसडीजी' क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या आणि त्या प्रदेशांतील व्यावसायिक वा सामाजिक आव्हाने सोडविणाऱ्या महिलांच्या नेतृत्वाखालील नफा कमावणाऱ्या व ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना या उपकमाचा लाभ मिळू शकेल.
या घोषणेविषयी अधिक माहिती देताना 'आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन'च्या संचालिका व 'आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड'च्या सीईओ विशाखा मुळ्ये म्हणाल्या, “आम्ही देशासाठी समान, सर्वसमावेशक व दीर्घकालीन अशी सामाजिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘वुमनप्रेन्योर्स फॉर भारत १.०' या उपक्रमाच्या माध्यमातून, देशातील महिला उद्योजकांच्या प्रगतीला चालना देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. संधी मिळत नसलेल्या प्रदेशांतील भारतीयांना नाविन्यपूर्ण उपायांद्वारे सेवा पुरविण्याची क्षमता बाळगणाऱ्या उद्योजकांसाठी हा उपक्रम आहे.”
'बिट्स पिलानी'चे कुलगुरु प्रा. व्ही. रामगोपाल राव म्हणाले, “भारताच्या कानाकोपऱ्यातील विविधांगी लोकसंख्येला स्थानिक उद्योजकांकडून स्थानिक उपाय पुरविले जाण्याची आवश्यकता आहे. मला ठाम विश्वास आहे की नवकल्पनांच्या पुढच्या लाटेचे नेतृत्व महिला नवउद्योजिका, विशेषत: ईशान्येकडील राज्यांत राहणाऱ्या नवउद्योजिका करतील आणि त्या प्रदेशातील असाधारण स्वरुपाच्या समस्या त्याच सोडवतील. यातील काही नवकल्पना समाजासमोर आणण्यात आणि त्यांना वाढीसाठी मदत करण्यात महिला उद्योजक मंच आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”
या घडामोडींविषयी बोलताना 'डब्ल्यूईपी'च्या मोहीम संचालिका अॅना रॉय म्हणाल्या, “टेक-फॉर-गुड क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प धोरणात्मक स्वरुपाचा आहे. उत्तम बाजारपेठ असलेल्या, प्रभाव पाडण्याची क्षमता असणाऱ्या, लैंगिक समानतेच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी अनुरुप आणि महिलांच्या माध्यमातून विकास होणाऱ्या डिजिटल स्वरुपाच्या तांत्रिक क्षेत्राशी संबंधित हा प्रकल्प आहे. विशेष विकास क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून नवकल्पनांचे नेतृत्व करणाऱ्या महिला उद्योजिका या उद्योग आणि समाज या दोन्हींसाठी लक्षणीय लाभ मिळवून देऊ शकतात, हे सिद्ध झालेले आहे."
या उपक्रमामध्ये पात्र ठरलेल्या स्टार्ट-अप्सना १० लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर 'पीआयईडीएस'कडून 'इन्क्युबेशन'साठी सहकार्य, एकास एक स्वरुपाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, बाजारपेठ मिळविण्यासाठीची मदत आणि भविष्यात गुंतवणूक वाढवण्याच्या संधी, असे साह्यही या स्टार्टअप्सना दिले जाणार आहे. यामध्ये स्वारस्य असलेल्या नवोन्मेषक महिलांनी पुढील वेबसाईटवर अर्ज करावेत : https://www.f6s.com/womenpreneurs-for-bharat-1.0/apply
देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियान
मुंबई : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र शासना कडून राबविण्यात येत...
