Filmy Mania

रोहित म्हणतोय ‘मनवाच्या लग्नाला जाऊ दे न व…’

सध्या लग्नसराई सुरू आहे. कलाकारांसह मालिकांमध्ये देखील लगीनघाई दिसत आहे. झी युवावरील तू अशी जवळी राहा मालिकेत देखील मनवा आणिराजवीर हे लग्नबेडीत अडकणार आहेत. लग्न अगदी मराठमोळ्या वैदिक पद्धतीत पार पडणार असून मेहंदी, हळदी, संगीत या सर्व समारंभाची लगबगमालिकेत दिसत आहे. मनवाच्या संगीतमध्ये गायक रोहित राऊत सज्ज होऊन या जोडप्यासाठी एक खास गाणं सादर करणार आहे. नाळ चित्रपटातील जाऊ देन व या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर रोहितने एक खास गाणं तयार करून मनवाच्या संगीत समारंभात सादर केलं. या गाण्याची झलक चाहत्यांना सोशलमीडियावर पाहायला मिळाली आणि या सुंदर गाण्याला प्रेक्षकांनी दाद देखील दिली. मनवा आणि राजवीरचा लग्न सोहळा रविवार ९ डिसेंबर रोजी ७ वाजता १तासाच्या विशेष भागात संपन्न होणार आहे.

इन्सपेक्टर ‘माऊली’ सर्जेराव देशमुखच्या येण्याने सुपर मंचावर होणार धमाल आणि मस्ती

सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली आहे. कलाकारांच्या येण्याने सुपर डान्सर्सच्या परफॉर्मन्सला चारचाँद लागले. आता पुन्हा प्रेक्षकांचे...

‘अप्सरा आली’ची परीक्षक बनली सोनाली कुलकर्णी

झी युवा लवकरच 'अप्सरा आली' हा  लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. अप्सरा आली हे ठसकेदार गाणं आणि या गाण्यातून जिने अख्ख्या महाराष्ट्राला...

सिडनी आणि मेलबर्नच्या डेस्टिनेशनवर व्हिडीयो पॅलेसची ‘झिलमिल’

बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचे वेड लावणार-या व्हिडीयो पॅलेसने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एक नवीन म्युझिक व्हिडीयो प्रेक्षकांसाठी...

पॅरिस मध्ये चित्रित झाला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’

जगभरात फ्रान्समधील पॅरिस हे शहर सर्वात ‘रोमँटिक’ शहर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच अनेक चित्रपटांचे, हिंदी सुद्धा, चित्रीकरण तेथे झाले आहे. परंतु पहिल्यांदाच एखाद्या मराठी...

Popular