Filmy Mania

‘एक होती राजकन्या’ मध्ये आस्ताद काळेंची नव्या पात्रासह एंट्री

सोनी मराठीवरील 'एक होती राजकन्या' मधील 'अवनी'ने आता प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर केले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या राजकन्येचा हा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे....

‘नॉक! नॉक! सेलिब्रिटीं’ मध्ये सुमीत राघवन व क्षिती जोग!

मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. सध्याच्या काळात हे कुतूहल शमवण्याचं काम वेगवेगळी समाजमाध्यमं आणि स्वतः सेलिब्रिटी सातत्यानं...

झी युवावरील मालिकांमध्येही होणार, होळीच्या विविध रंगांची उधळण!!!

होळी म्हणजे जुने वादविवाद सोडून देऊन, रंगांची उधळण करण्याचा सण आहे. आपण विविध सण व उत्सव साजरे करत असतांना, मालिकांमध्येही हे सण साजरे होणे...

दिमाखदार सोहोळ्यात संपन्न झाला झी चित्र गौरव पुरस्कार 2019

मराठी चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित झी चित्र गौरव २०१९चा पुरस्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत पार पडली. यंदा झी गौरव पुरस्कार...

अनुकंपातत्व सारख्या महत्वाच्या विषयावर आधारित वडील आणि मुलीचा अनोखा प्रवास

गेले काही दिवस बाबांच्या ज्या राजकन्येविषयी सर्वत्र चर्चा चालली होती ती राजकन्या आता प्रेक्षकांच्या भेटीसआली आहे. साधी, मध्यमवर्गीय, मनमिळावू अशी राजकन्येच्या रुपातून ‘अवनी जयराम भोसले’ छोट्या पद्यावरआपल्याला दिसली आणि अगदी पहिल्याच एपिसोड पासूनच  तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत .सोनी मराठीवरील ‘एक होती राजकन्या’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे .   अभिनेते किशोरकदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्या या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच  एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड  नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे  नेहमी डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचं स्वप्नं पाहणा-या अवनीचा कॉन्स्टेबल म्हणून प्रवासाला सुरुवात झालीआहे.आणि ती नुकतीच अनुकंपातत्वावर पोलीस  खात्यात भरती झाली आहे .  अनुकंपा तत्व म्हणजे शासकीयसेवेत असताना दिवंगत किंवा अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांची त्यांच्या ठिकाणी कामकरण्यासाठी नियुक्ती केली जाते. बाबांचं छत्र हरवल्यामुळे त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर आपल्या अवनीचीनियुक्ती झाली आहे. बाबांचं छत्र हरवल्यानंतर खंबीर बनून अवनी सर्व जबाबदा-या योग्य रितीने पार पाडण्याच्याप्रयत्नात आहे. बाबांची शिकवण आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्यातील गुण हे  अवनीमध्ये देखील आपसूकआले आहेत.  अवनीचा मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि  रोखठोकपणे आपली मतं मांडण्याचा स्वभावप्रेक्षकांनी नक्की अनुभवला असेल. अश्या ह्या बाबांच्या लाडक्या राजकन्येचा एक अनोखा  प्रवास नक्की पहा. तिच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पाहत राहा ‘एक होती राजकन्या’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७:३०वाजता फक्त सोनी मराठीवर.

Popular