Feature Slider

आठवड्यातून सातही दिवस कोल्हापूर-बेंगळुरू दरम्यानच्या थेट दैनंदिन विमान सेवा सुरू

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल डॉ. विजय कुमार सिंह (निवृत्त) यांनी आज कोल्हापूर ते बेंगळुरू थेट विमान सेवेचे उद्घाटन केले. ही विमान सेवा13 जानेवारीपासून खालील वेळापत्रकानुसार सुरू होईल: Flight No.FromToDepartureArrivalFrequencyAircraft6E - 7427BengaluruKolhapur14:5016:45Daily ATR6E - 7436KolhapurBengaluru17:0518:50Daily नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उद्घाटन प्रसंगी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले की, कोल्हापूरच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करून नवीन विमानतळ टर्मिनल बांधणे, धावपट्टीचा विस्तार करणे आणि एटीसी टॉवरची स्थापना यासाठी 245 कोटींची गुंतवणूक निश्चित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, भारतातील प्रत्येक कानाकोपरा जोडण्याचा दृष्टीकोन आणि ध्येय पुढे नेत, या मार्गाच्या उद्घाटनाने कोल्हापूर हे हैदराबाद, तिरुपती, मुंबई, अहमदाबाद आणि आज भारताची सिलिकॉन राजधानी बेंगळुरूशी जोडले गेले आहे. मंत्री पुढे म्हणाले की, ही कनेक्टिव्हिटी सुरू झाल्यामुळे नवीन संधी निर्माण होतील आणि दोन्ही शहरांतील लोकांना त्याचा फायदा होईल. जनरल डॉ. विजय कुमार सिंग (निवृत्त) यांनी ही कनेक्टिव्हिटी मिळाल्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचे अभिनंदन केले, ज्यामुळे परिसरातील व्यवसाय, व्यापार आणि पर्यटन संधी वाढण्यास मदत होईल. लोकसभेचे खासदार प्रा.संजय सदाशिवराव मंडलिक, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार रुतुराज संजय पाटील आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. याशिवाय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव एस. के. मिश्रा, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग आणि नागरी हवाई मंत्रालयातले प्रतिनिधी (MoCA), भारतीय विमान प्राधिकरणाचे प्रतिनिधी (AAI), इंडिगो विमान कंपनीतले प्रतिनिधी(IndiGo) आणि कोल्हापूर येथील स्थानिक प्रशासनातील इतर मान्यवरही उपस्थित होते.

जी-२० च्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा युवकांशी संवाद

पुणे, दि.१४- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद...

ग्राम विकासाचा ध्यास घेऊन काम कराः-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे- जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत त्यांचा जाहीर सत्कार समारंभ, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील...

16 आणि 17 जानेवारीला जी20 परिषदेच्या पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुण्यामध्ये

पुणे- भारताच्या जी20 अध्यक्षतेंर्गत जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाची(IWG) पहिली बैठक पुण्यामध्ये 16-17 जानेवारी 2023 रोजी आयोजित होणार आहे. या मंचावर आयडब्लूजी सदस्य देश, अतिथी देश...

लोकशाही मार्गाने न्याय मिळतो हे रिक्षा चालकांनी सिद्ध केले ः बाबा कांबळे

रॅपिडो बंदच्या निर्णयाचा भंडारा उधळून रिक्षा चालक मालकांनी केला आनंदोत्सव पिंपरी / प्रतिनिधी काही रिक्षा संघटनांनी रिक्षा चालकांना चुकीच्या मार्गाने आंदोलन करायला लावून अडचणीत टाकण्याचे काम...

Popular