५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कार्टूनिस्टर कम्बाईन ही अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आहे. कार्टूनिस्टस कम्बाईन तर्फे व भारतीय जनता पक्ष, पुणेच्या सहकार्याने ५ मे रोजी घोले रस्ता, पुणे येथील राजा रवीवर्मा आर्ट गॅलरीच्या जवाहरलाल नेहरु सभागृहात सायंकाळी ४.३० ते ८ या वेळात व्यंगचित्रकलेविषयी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात मराठीतील विविध व्यंगचित्रकार प्रात्याक्षिके, मार्गदर्शन, चर्चासत्रे यात भाग घेतील. व्यंगचित्रकलेबद्दल awareness वाढवणे, व्यंगचित्रे कशी काढतात याचे मार्गदर्शन, अधिकाधिक तरुणांना यात सहभागी करुन घेणे, व्यंगचित्रकलेमधील नवीन संधी, व्यंगचित्रकलेमधील विविध प्रकार याबद्दल माहिती देणे ही या कार्यमाची उद्दिष्टे आहेत. या कार्यक्रमात माननीय शि. द. फडणीस, मंगेश तेंडूलकर, चारुहास पंडित, वैजनाथ दुलंगे, घनश्याम देशमुख, भटू बागले, विवेक प्रभूकेळूस्कर आदी व्यंगचित्रकार भाग घेतील. यात राजकीय व्यंगचित्रे, सामाजिक व्यंगचित्रे, कार्टून स्ट्रिप्स, अर्कचित्रे, फिगर drawing चे महत्त्व इत्यादी प्रकार हाताळले जातील. याच बरोबर या ठिकाणी तुमचे व्यंगचित्र तुमच्यासमोर हा उपक‘म राबवला जाईल.
हा कार्यक‘म सर्वांसाठी विनामुल्य खुला आहे.