पुणे- आर्थिक निकषावर शिक्षण आणि नौकरीत आरक्षणा च्या मागणीसह पुण्याच्या छत्रपती विमानतळाला बाजीराव पेशव्यांचे नाव द्या … अशा विविध मागण्यांवर ब्राम्हण समाजाच्या वतीने मोर्चा काढणाऱ्या आयोजक नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद असल्याचे आज येथे स्पष्ट झाले .काही सर्व मान्य होतील अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या
महाराष्ट्रातील विविध गावांमधून ब्राम्हण समाजाने या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येण्याचा प्रयत्न केला . पण पुण्यातून साथ मिळेना आणि मागण्यांबाबत एकमत होईना असे अस्पष्ट चित्र घेवूनच शनिवार वाड्यावरून पायी निघालेला हा मोर्चा जेव्हा विधानभवना समोर आला तेव्हा पहा मिडिया समोर नेमके काय कसे घडले .