पुणे- येथील लष्कर परिसरातील एमजीरोडवर जुन्या बंद झालेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांची म्हणजे तब्बल एक कोटी बारा लाख पन्नास हजारांची रक्कम २५ टक्के कमिशन ने बदलण्यास आली असताना पोलिसांनी धाड मारून जप्त केली .. ही कारवाई काल (गुरुवारी) रात्री करण्यात आली.
भरत राजमल शहा (रा. शंकर शेठ रोड )असे ही रक्कम बदलून घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शहा हा ही रक्कम एम एच१४ बी सी ६२९४ क्रमांकाच्या मोटारीतून बदलण्यासाठी एका कापडी पिशवीतून येथे घेवून आला होता . याबाबतची माहिती लष्कर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर आणि त्यांच्या पथकाने हि कारवाई केली आणि प्रकरण आयकर विभागाकडे पाठविले आहे . याप्रकरणी आज शहा याच्याकडून पोलीस अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत .


