Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

देशाला गुलामगिरीकडे नेणारे भाजपचे राजकारण -उद्धव बाळासाहेब ठाकरे

Date:

संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान /भाजपचे राजकारण घृणास्पद

मुंबई-संजय राऊत यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईचा ठाकरेंनी तीव्र शब्दांत निषेध करुन संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. सर्वच दिवस सारखे नसतात. आता तुमची सत्ता आहे. पण, हे दिवस फिरले तर तुमचे काय होईल, याचा तरी विचार करा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. देशात भाजपतर्फे सध्या अत्यंत भेसूर आणि निर्घृण राजकारण सुरू आहे. भाजपसोबत जे जातील, तेच आपले. जे भाजप गुलाम होतील ते काही काळ आपले. त्यांचा वापर संपल्यानंतर त्यांना दूर करायचे, हेच भाजपचे राजकारण आहे. राजकारण बुद्धीबळासारखे करायचे असते, असे आतापर्यंत समजत होतो. मात्र, आता बुद्धी नाही तर केवळ बळाचा वापर केला जात आहेअसेही ठाकरे म्हणाले

सामान्यांनी विचार करावा

महाराष्ट्रातील शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले होते. या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, नड्डांचे हे वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारे आहे. देशातील सर्वच लोकांनी आपले कान, डोळे उघडे ठेवून देश कुठे चालला आहे, हे पहायला हवे. तसेच, देशाला हुकुमशाहीकडे नेण्यासाठी भाजपला मदत करायची की नाही, यावर सामान्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे.

भाजपचा वंश कोणता

काल जे. पी. नड्डा म्हणाले होते, इतर पक्षात 30, 40 वर्षे काम करुन अनेकजण आता भाजपमध्ये येत आहेत. देशात केवळ भाजप हा एकच पक्ष आहे, जो संपणार नाही. केवळ भाजप टीकणार. महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष तर संपण्याच्या मार्गावर आहे. या वक्तव्यांचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, नड्डांचे हे वक्तव्य देशाला एकछत्री अंमल व हुकुमशाहीकडे नेणारा आहे. भाजपमध्ये इतर पक्षातून लोक आले आहेत. त्यामुळे वंशवेल वाढण्यासाठी भाजपचा वंश आहेच कुठे.

राऊतांबद्दल अभिमान

संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले, संजय व माझे कौटुंबिंक संबंध आहे. संजय कट्टर शिवसैनिक आहे. संजय राऊतांचा मला अभिमान आहे. अजून वेळ गेलेली नाही. प्रत्येकाची वेळ बदलत असते. माझ्यासोबत असलेले खासदार आणि आमदार हे निष्ठावान व कट्टर शिवसैनिक आहेत.

देशात हिटलरशाही

ठाकरे म्हणाले, हिटलरने आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी अत्यंत निर्घृण राजकारण केले. देशातही आता असेच भेसूर राजकारण सुरू आहे. काँग्रेसने देशावर 60, 65 वर्षे राज्य केले. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण कधी गर्व केला नाही. मात्र, आता आम्ही म्हणून तेच सत्य असा प्रकार सुरु आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...