पुणे – महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला परंतु पुण्यातील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी येथील राष्ट्रीय स्मारकासाठी निधी जाहीर केला नाही ,मातंग समाजासाठी अत्यंत आवश्यक असणारे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळासाठी कोणतीही घोषणा केली नाही शिवाय आण्णा भाऊ साठे यांच्या जयंत्ती च्या सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यासाठी ही तरतूद केली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पा चा मी जाहीर निषेध करतो कारण यामध्ये मातंग समाजाला जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने याचा निषेध करण्यासाठी अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यात आल्यावर मातंग समाजाच्या मागण्याचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे शहराध्यक्ष भीमराव साठे यांनी इशारा दिला आहे.
मातंग समाजासाठी कोणतीही तरतूद नाही,मातंग समाजामध्ये अस्वस्थता आहे समाजाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी अर्थपुरवठा करणारे महामंडळ दुर्लक्षित ठेवले आहे .तसेच पुण्यातील संगमवाडी येथील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अजिबात तरतूद केली नाही .तसेच मुंबई येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे चिरानगर येथील राष्ट्रीय स्मारकासाठी ही तरतूद नाही. यामुळेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याचे शहराध्यक्ष भीमराव साठे यांनी पत्रक काढले आहे.

