पुणे- महानगरपालिकेत आज मुख्यसभेत झालेल्या पीएमपीएमएलच्या संचालकपदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे हे विजयी झाले. शिवसेनेने भाजपच्या बाजूने मतदान केले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त हे पीएमपीएलचे सदस्य असतात. संचालकपदासाठी आज निवडणूक झाली. या वेळी भाजपकडून नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेकडून योगेश ससाणे यांना उमेदवारी देण्यात आली. महापालिकेतील भाजपचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचा उमेदवार विजयी होणार हे निश्चित होते. तरी देखील विरोधकांकडून ससाणे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीमध्ये सिद्धार्थ शिरोळे यांना ७६ मते आणि ससाणे यांना ३० मते मिळाली.
पीएमपीएमएलच्या संचालकपदी सिद्धार्थ शिरोळे
Date:

