‘मिशन विधानसभा 2019’साठी मुख्यमंत्र्यांकडून खासदार काकडेंवर विशेष जबाबदारी?

Date:

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने खासदार संजय काकडे पुन्हा सक्रिय
पुणे : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झालाय. राहिलीय ती फक्त औपचारिकता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेली महाजनादेश यात्रा पुण्यात येत असून त्याच्या नियोजन व तयारीसाठी भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे चांगलेच सक्रिय झालेले दिसत आहेत. पुणे शहर भाजपाच्या वतीने आयोजित महत्वपूर्ण बैठकीत खासदार काकडे यांनी जबाबदारी घेत महाजनादेश यात्रेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेतली.
लोकसभा निवडणुकीत खरेतर संजय काकडे पुण्यातून इच्छुक होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दानंतर त्यांनी आपली तलवार म्यान केली. त्यानंतर राजकीय दृष्ट्या खासदार काकडे शांत होते. मुख्यमंत्री फडणवीस स्वतःच आपल्याबद्दल निर्णय घेतील व तो मान्य करून मी पक्षाचे काम करेल असं अनेकदा खासदार काकडे यांनी सांगितले आहे. परवा मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात लोहगाव विमानतळापासून ते शेवटपर्यंत खासदार संजय काकडे मुख्यमंत्री फडणवीसांसोबत त्यांच्या गाडीतच होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार काकडे यांच्या घरी जाऊन गणपती ची आरती केली. आणि या पूर्ण दौऱ्यात पुण्याचे खासदार गिरीश बापट मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाडीत नव्हते. ही बाब प्रकर्षाने जाणवत होती.
महाजनादेश यात्रेच्या नियोजनानिमित्त पुणे शहर भाजपाच्या वतीने आयोजित महत्वपूर्ण बैठकीलाही खासदार गिरीश बापट गैरहजर होते. यावेळी खासदार संजय काकडे यांनी या बैठकीची सूत्रे हाती घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत असलेल्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी खासदार बापट वगळता पक्षाचे सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
2017 मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला गर्दी न झाल्याने त्याची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. त्यामुळे महाजनादेश यात्रेच्या पुणे दौऱ्यात असा अनुभव पुन्हा येऊ नये म्हणून खासदार संजय काकडे यांनी विशेष लक्ष घातल्याची चर्चा सुरू आहे.
खासदार संजय काकडे यांनी नोटबंदी समर्थनार्थ पुण्यात सुमारे 60 हजार नागरिकांची रॅली काढली होती. तसेच, भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानावेळी तब्बल दीड लाख सदस्य नोंदणी एकट्या खासदार काकडे यांनी केली होते. याबरोबरच महापालिका निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खासदार काकडे यांच्यावर विशेष जबाबदारी दिली होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. गर्दी आणि खासदार काकडे असं समीकरण असल्याने महाजनादेश यात्रेच्या नियोजनात खासदार काकडे महत्वाची भूमिका बजावू शकतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत असलेल्या महाजनादेश यात्रेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहू नये आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हावी यासाठी खासदार काकडे लक्ष देत असल्याने पुन्हा एकदा खासदार संजय काकडे सक्रिय झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...