Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजपा मुख्यालयाला अच्छे दिन : दिल्लीत वास्तुशास्त्रानुसारच नवे अत्याधुनिक कार्यालय… २०१९ ची लोकसभा इथूनच लढणार

Date:

नवी दिल्ली

११ कोटी सदस्यसंख्येचा जागतिक विक्रम करणार्‍या ११ अशोक रोड या भाजपा मुख्यालयाला आता अच्छे दिन येणार असून ते अत्याधुनिक चेहरा प्राप्त करण्यासाठी दोन एकर जागेत स्थलांतरित होत आहे म्हणजे  पत्ता आता बदलणार आहे. भाजपाचे मुख्यालय लवकरच पं. दीनदयाल उपाध्याय मार्गावर जाणार आहे. कार्यालयाची मुख्य इमारत सहा मजली होत  असून, त्याच्या आजूबाजूला तीन-तीन मजल्यांच्या काही इमारती होत आहेत. प्रत्येक मजल्यावर सभागृहअसेल . कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या गच्चीवर हेलिपॅडचीही व्यवस्था राहणार असल्याचे समजते.
विशेष म्हणजे या सर्व इमारती वास्तूशास्त्राने परिपूर्णअशाच बांधण्याचे स्पष्ट आदेश आहेत

पुढील महिन्यात म्हणजे नवरात्रात भाजपाच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपा आपल्या नव्या कार्यालयातून काम सुरू करणार आहे. आयटीओ क्रॉसिंगजवळील दीनदयाल उपाध्याय मार्गावर भाजपाला नव्या कार्यालयासाठी दोन एकर जागा मिळाली आहे.सध्याचे भाजपा कार्यालय टाईप आठच्या सरकारी बंगल्यात आहे. मात्र, या ठिकाणी आता जागा कमी पडत आहे. पक्षाच्या वारंवार होणार्‍या बैठका, अतिमहत्त्वाच्या नेत्यांचे आगमन, त्यांची सुरक्षा, मोर्चे, मिरवणुका, जल्लोष यामुळे या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीची समस्याही वारंवार उद्‌भवत होती. त्यामुळे नवीन कार्यालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या कार्यालयात भूमिगत पार्किंग, सभागृह, ग्रंथालय, वाचनकक्ष, माध्यमांसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वागतकक्ष, प्रतीक्षालय, पदाधिकार्‍यांसाठी कक्ष आणि उपहारगृह आदी व्यवस्था राहणार आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे कार्यालय सुसज्ज राहणार आहे. नव्या कार्यालयात पक्षाच्या प्रत्येक विभागासाठी आणि आघाडीसाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे.

नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना ११ अशोका रोडचे नूतनीकरण करण्यात आले होते. याठिकाणी पत्रपरिषदा आणि अन्य कार्यक्रमांसाठी एक ऑडिटोरियम बांधण्यात आले होते. विविध वास्तूविशारदांकडून कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी डिझाईन मागविण्यात आले आहे. या वास्तूविशारदांशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पदाधिकार्‍यांनी नुकतीच चर्चा केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...