उद्योजक एस. बालन यांना मान्यवरांनी अर्पण केली श्रद्धांजली
पुणे- साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण असलेल्या एस. बालन यांच्यावर दैवी संस्कार झालेले होते. अत्यंत मृदु स्वभावचे, विनम्र, आदर्श व्यक्तीमत्व असलेले एस. बालन खऱ्या अर्थाने व्हिजनरी उद्योजक, शिक्षण महर्षि होते, त्यांच्या निधनाने अनेकांचा आधारवड हरपला अशी भावना व्यक्त करत मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक कामात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या एस. बालन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी माजी खासदार रजनी पाटील, उद्योजक प्रकाश धारीवाल, मराठी बांधकाम व्यावसायिक सघटनेचे अध्यक्ष गजेंद्र पवार, आमदार अरुण जगताप, नगरसेवक अविनाश साळवे, प्रजापती ब्राम्हकुमारी परिवाराच्या सुनंदा दीदी, पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवीदास भंसाली, शिवसेनाचे रघुनाथ कुचिक, अशोक अष्टेकर, डॉ. नारायण ढेकने, अजिंक्य घाटे, राजेंद्र चोप्रा, उमेश जोशी, सतीश जोशी, परिवर्तनचे किशोर ढगे, आयसर चे डॉ. नातू, पोलिस अधिकारी विलास भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एस.बालन यांच्या आठवणीना उजाळा देत आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी एस. बालन यांचे सुपुत्र पुनीत बालन यांनी कृतज्ञता व्यक्त करत बालन परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानले.


