२०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत स्टँडअलोन बेसिसवर भारत पेट्रोलियमने नोंदवला १९५९.५८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा

Date:

·         बीपीसीएलने ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ या तिमाहीत १,३३,३३१.४६ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला तर याच तुलनात्मक तिमाहीत १,१७,४६२.९३ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे. एप्रिल-डिसेंबर २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीतील कामकाजामधून महसूल ४,००,०५३.७४ कोटी रुपये तर  मागील वर्षाच्या संबंधित कालावधीसाठी ३,०९,०४०.४८ कोटी रुपये इतका होता.

·         आर्थिक वर्ष २२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा आर्थिक वर्ष २१-२२ च्या त्याच संबंधित तिमाहीतील २,८२८.४५ कोटी रुपयाच्या रीस्टेटेड नफ्याच्या तुलनेत १९५९.५८ कोटी रुपये इतका होता.

मुंबई: भारतातील प्रमुख एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी एक असलेल्या भारत पेट्रोलियमने आर्थिक वर्ष २१-२२ च्या याच कालावधीतील ८,८६२.२७ कोटी रुपयांच्या रीस्टेटेड नफ्याच्या तुलनेत एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी ४,६०७.६४ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे.

आर्थिक निकालांचे प्रमुख ठळक मुद्दे खाली दिले आहेत (स्वतंत्र) –

·         MCA आदेशानुसार, बीना रिफायनरी (पूर्वीची भारत ओमान रिफायनरीज लिमिटेड) बीपीसीएल मध्ये विलीन करण्यात आली होती आणि बीना रिफायनरीची आर्थिक कामगिरी १ जुलै २०२१ पासून बीपीसीएल मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. MCA आदेशानुसार, भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड बीपीसीएल सोबत एकत्र करण्यात आली होती आणि भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडची आर्थिक कामगिरी १ एप्रिल २०२१ पासून बीपीसीएल मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. वरील विलीनीकरणाच्या संदर्भात, संबंधित कालावधीसाठी खाती (पुनर्स्थित) रीस्टेटेड केली गेली आहेत.

·         एप्रिल ते डिसेंबर २२ या कालावधीसाठी कंपनीचे ग्रॉस रिफायनिंग मार्जिन (GRM) २०.०८/bbl डॉलर होते

·         तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा १९५९.५८ कोटी रुपये इतका झाला.

·         EBITDA आर्थिक वर्ष २१-२२ च्या तिसर्‍या तिमाहीतील ५,७६०.६६ कोटी रुपयांच्या तुलनेत  आर्थिक वर्ष २२-२३ च्या तिसर्‍या तिमाहीसाठी ४,६८५.८२ कोटी रुपये असा सकारात्मक आहे; EBITDA मार्जिन आर्थिक वर्ष २१-२२ च्या तिसर्‍या तिमाहीतील ४.९०% च्या तुलनेत  आर्थिक वर्ष २२-२३ च्या तिसर्‍या तिमाहीसाठी ३.५१% होता.

·         ३१ डिसेंबर २०२२ रोजी कर्ज-इक्विटी गुणोत्तर ०.८८ पट होते (३१ डिसेंबर २०२१ रोजीच्या ०.६४ पट या तुलनेत)

प्रत्यक्ष कामगिरी (स्टँडअलोन)

·         आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीतील ९.९४ एमएमटी थ्रूपुटच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत थ्रूपुट ९.३९ एमएमटी होता. आर्थिक वर्ष २२ च्या तिसऱ्या तिमाहीतील ११.१५ एमएमटी बाजारपेठीय विक्रीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत बाजारपेठीय विक्री १२.८१ एमएमटी होती. विक्रीमध्ये १४.८९%नी वाढ झाली. एप्रिल ते डिसेंबर २२ दरम्यान थ्रूपुट २७.९० एमएमटी होते तर एप्रिल ते डिसेंबर २१ मध्ये ते २५.७५  एमएमटी होते. बाजारपेठीय विक्री एप्रिल ते डिसेंबर २१ मध्ये (१७.३३%वाढ) ३०.६९ एमएमटी वरुन  एप्रिल ते डिसेंबर २२ या कालावधीसाठी ३६.०१ एमएमटी झाली आहे.

·         आम्ही एप्रिल ते डिसेंबर २२ या कालावधीत १०.१७% सरासरी इथेनॉल ब्लेंडिंग टक्केवारी गाठली आहे. 

·         बीपीसीएलने आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत २९८ नवीन इंधन केंद्रांची भर घातली (एप्रिल ते डिसेंबर २२ मध्ये ६८६) असून नेटवर्क सामर्थ्य २०७२९ पर्यंत वाढविले आहे.

·         आर्थिक वर्ष २३ च्या तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते डिसेंबर २२ दरम्यान ४ ची भर) ३ ची भर घालत कंपनीच्या मालकीचे कंपनी ऑपरेटेड आउटलेट्सचे नेटवर्क वाढून ३२५ पर्यंत झाले आहे.

·         त्यापुढे ३१ डिसेंबर २०२२ रोजी बीपीसीएलने FINO वित्तीय सेवांचा विस्तारत १३,१८७ इंधन केंद्रे केली.

·         बीपीसीएलने आर्थिक वर्ष २३ च्या तिसर्‍या तिमाहीत (एप्रिल ते डिसेंबर २२ दरम्यान २४) ७ नवीन वितरकांची भर घातली. त्यायोगे ३१ डिसेंबर २२ रोजी नेटवर्कची संख्या ६२३५ झाली आणि ग्राहक संख्या ९.१६ कोटी पर्यंत वाढली

·         आर्थिक वर्ष २३ च्या तिसर्‍या तिमाहीत ६२ सीएनजी केंद्रे सुरू झाली (एप्रिल ते डिसेंबर २२ मध्ये १२८) आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी एकूण सीएनजी केंद्रे १२६० झाली.

आर्थिक वर्ष २३ च्या तिसर्‍या तिमाहीत आर्थिक ठळक वैशिष्ट्ये

                                                                                                                        (रु.कोटीमध्ये)

 ConsolidatedStandalone
 Q3FY23Q3FY22% ChangeQ3FY23Q3FY22% Change
कामकाजीय महसूल1,33,3481,17,49813.49%1,33,3311,17,46313.51%
EBITDA4,6285,790 4,6865,761 
निव्वळ नफा1,7472,759 1,9602,828 

एप्रिल ते डिसेंबर २२ आर्थिक ठळक वैशिष्ट्ये

                                                                                                                        (रु.कोटीमध्ये)

 ConsolidatedStandalone
 9M FY239M FY22% Change9M FY239MFY22% Change
कामकाजीय महसूल4,00,1283,09,15129.43%4,00,0543,09,04029.45%
EBITDA1,50617,303 1,25416,726 
निव्वळ नफा(4,739)9,122 (4,608)8,862 

आर्थिक वर्ष २३ च्या तिसर्‍या तिमाहीतील कामगिरीवर भाष्य करताना संचालक (वित्त) आणि C&MD चा अतिरिक्त भार आणि संचालक (एचआर) श्री वेत्सा रामकृष्ण गुप्ता म्हणाले, बाजारपेठेतील विक्रीत उच्च वाढ नोंदवत पेट्रोलियम उत्पादनांच्या मार्केटिंगमध्ये बीपीसीएलने चांगली कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २३ च्या तिसर्‍या तिमाहीत बाजारातील विक्री १४.९%ने वाढली  आणि डिसेंबर २२ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांत १७.३% नी वाढली आहे. बीपीसीएलने संबंधित तुलनात्मक तिमाहीतील १,१७,४६२.९३ कोटी रुपयांच्या तुलनेत ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत १,३३,३३१.४६ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला.

पुढे, कंपनीने आर्थिक वर्ष २२ मधील तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत पेट्रोलियम उत्पादनांच्या मजबूत आंतरराष्ट्रीय क्रॅकद्वारे समर्थित असलेल्या आर्थिक वर्ष २३ मधील तिसऱ्या तिमाहीत मध्ये उच्च सकल शुद्धीकरण मार्जिन नोंदवले. यामुळे, चांगल्या विपणन कामगिरीसह आर्थिक वर्ष २३ मधील तिसऱ्या तिमाहीसाठी १९५९.५८ कोटी रुपयांचा करपश्चात नफा झाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...