
‘रसिकमोहिनी’ संस्थेच्या ‘जन्मरहस्य’ या नाटकाची टीम ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रमात येत्या मंगळवारी २२ मार्चला रात्री ९:३० वाजता धमाल करताना आपणास दिसेल. सध्या या नाटकाने रसिकांची मने जिंकल्याने प्रत्येकाच्या मनात हे नाटक घर करून बसले आहे. झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात या टीमला बोलावल्याने टीम सध्या भलतीच खुश आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे चित्रिकरण पार पडले. कुमार सोहोनी दिग्दर्शित‘जन्मरहस्य’ प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेले हे नाटक असल्याने या नाटकाचा विषयही चाकोरीपलीकडचा आहे. लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी हे मनोविश्लेषणात्मक सस्पेन्स थ्रिलर नाटक अत्यंत सफाईनं विणलं आहे.
निर्माती व अभिनेत्री भाग्यश्री देसाई याचं ‘जन्मरहस्य’ नाटक आहे. या नाटकात अमिता खोपकर, भाग्यश्री देसाई, वसुधा देशपांडे, गुरुराज अवधानी, अजिंक्य दाते अशी दिग्गज कलाकाराची फळी असून या नाटकाच्या निर्मात्या ‘रसिकमोहिनी’ संस्थेच्या भाग्यश्री देसाई या आहेत. संगीतकार – अशोक पत्की, नेपथ्य – अजय पुजारे, सूत्रधार – देनू पेडणेकर, शेखर दाते, प्रविण बर्वे हे आहेत.