पुणे- खरे तर अवधूत गुप्ते ..होय मराठीतला नामवंत संगीतकार गायक अवधूत आज कसबा गणपतीला गेला होता.. ८ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या बॉईज या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी .. पण बॉईज ची गाणी रेडीओ वर ऐका ..असे सांगून त्याने येथे झेंडा मोरयाची आठवण काढीत गायले मोरया चे गाणे …. अवधूत चा हा रोख .. काय सांगून जातो… नेमके बाप्पाला तो काय साकडे घालणार ? हे रसिकांना कोणी सांगण्याची आवशक्यता नाही .. त्याने गायलेले हे गाणे त्याचे शब्द सर्वांना ठाऊक असूनही पुन्हा इथे देत आहोत
तूच माझी आई देवा… तूच माझा बाप
घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया ||२||
काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय ||२||
माझा श्वास हि तुझीच माया तुझे हात पाय ||२||
कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य
का खेळिसी खेळ असा हा सारे अग्यम
तारू माझे पैलतीरी पार कराया
गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया
हो ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच
कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच ||२||
देवा तुला देवपण देती भक्तगण
दानवांना पापकर्म शिकवीतो कोण
निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया
गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया
आणि पहा हि अल्पशी व्हिडीओ झलक ..

