SHARAD LONKAR

55132 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा  १५ जुलै रोजी

 पुणे, ११ जुलै ः विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त...

‘टाटा केमिकल्सने सुरु केले मुळशीतील पहिले उपजीविका आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र’

~कौशल्य विकास आणि रोजगार संधी पुरवून स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण~ मुळशी, १२ जुलै, २०२४:  टाटा केमिकल्स सोसायटी ऑफ रूरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) या टाटा केमिकल्सच्या सीएसआर विभागाने कंपनीच्या समुदाय विकास उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून “लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट” या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने पुणे जिल्ह्यातील मुळशीमध्ये उपजीविका व कौशल्य प्रशिक्षण केंद्र आज सुरु केले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात टाटा केमिकल्स इनोव्हेशन सेंटरच्या आजूबाजूच्या १० गावांमधील सुमारे ४३० व्यक्तींना या केंद्राचा लाभ मिळणार आहे.  उपजीविका पुरवण्यासाठी आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी या केंद्रामध्ये प्रशिक्षण पुरवले जाईल, इतकेच नव्हे तर, प्रशिक्षित व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते. टीसीएसआरडी आणि एलओएलटीने मुळशीमध्ये सुरु केलेल्या या सर्वसमावेशक कौशल्य केंद्रामध्ये लघुकालीन प्रशिक्षण वर्ग चालवले जातील. यामध्ये एसी टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, कम्प्युटर्स, ब्युटी केयर, इंग्रजी संभाषण, मेहेंदी डिझाईन आणि जॉब रेडीनेस ट्रेनिंग यांचा समावेश असेल. टाटा केमिकल्सचे हेड - इनोव्हेशन, आरअँडडी, सीक्युएच आणि चीफ एथिक्स काऊंसेलर, डॉ रिचर्ड लोबो म्हणाले, "मुळशीमधील आमच्या इनोव्हेशन सेंटरच्या जवळ अशाप्रकारचे पहिले उपजीविका आणि कौशल्य विकास केंद्र सुरु करत असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. वैविध्यतेवर भर देत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणामार्फत स्थानिक सक्षमतेला प्रोत्साहन देण्याप्रती टाटा केमिकल्सची बांधिलकी या महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये अधोरेखित झाली आहे.  आजूबाजूच्या भागातील व्यक्तींना आवश्यक कौशल्ये आणि संसाधने पुरवून, सक्षम करून शाश्वत, पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा व आर्थिक स्वावलंबनासाठी संधी निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे. मुळशी भागातील व्यक्ती आणि कुटुंबांवर या केंद्राचा सकारात्मक प्रभाव निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे. हे व्हिजन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्या सह्योगी आणि भागधारकांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत." टाटा केमिकल्सचे मुख्य -...

जेएसडब्ल्यू समूहातर्फे बेंगळुरू येथे सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी एमएसआरआयटी आणि शारिका यांच्यासह सामंजस्य करारावर सह्या

जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे फ्लेक्झिबल पॉवर सिस्टीम्स- स्मार्ट ग्रिड क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण आणि विकासाला चालना दिली जाणार मुंबई आणि बेंगळुरू- अमेरिकी २४ अब्ज डॉलर्स जेएसडब्ल्यू समूहाने त्रिपक्षीय सामंजस्य करार केल्याची घोषणा केली आहे. संस्थेने विश्वेवरैय्या टेक्नोलॉजिकल विद्यापीठाशी संबंधित व कर्नाटक राज्य सरकारची मंजुरी असलेली सरकार स्वायत्त खासगी अभियांत्रिकी एमएस रामय्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीने (एमएसआरआयटी) आणि तांत्रिक ज्ञानावर आधारित सेवा व प्रशिक्षण, तसेच स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानाचे डिझाइन आणि विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या शारिका एंटरप्रायझेस कंपनीचा विभाग शारिका स्मार्टेक यांच्यासह हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार पारंपरिक ऊर्जा यंत्रणांचे नावीन्यपूर्ण सुविधांच्या मदतीने परिवर्तनशील ऊर्जा यंत्रणेत रूपांतर केले जाणार आहे. या त्रिपक्षीय करारानुसार बेंगळुरू येथील एमएसआरआयटीच्या कॅम्पसमध्ये स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानासाठी जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स (जेएसडब्ल्यू- सीओई) स्थापन केले जाणार आहे. या करारानुसार जेएसडब्ल्यू समूह जेएसडब्ल्यू- सीओईसाठी आवश्यक वित्तपुरवठा करेल, तर एमएसआरआयटी जेएसडब्ल्यू- सीओईची स्थापना व समन्वयात महत्त्वाची भूमिका बजावेल. शारिका स्मार्टटेक या संस्थेची नॉलेज पार्टनर असेल आणि कंपनीद्वारे जेएसडब्ल्यू- सीओईची स्थापना, कामकाज व हाताळणीसाठी मदत केली जाईल. या सामंजस्य करारातील तीन पक्ष समाजाच्या एकत्रित शक्तीचा वापर करून सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, ज्ञान वर्धनाला चालना देऊन कर्मचारी, इंजिनीअर्स व व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देतील. जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्सतर्फे शिक्षण, प्रशिक्षण आणि विकासासाठी प्लॅटफॉर्म पुरविला जाईल. हे अत्याधुनिक जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स शिक्षण आणि प्रशिक्षण मोड्युल्समध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी इंजिनीअरिंग व्यावसायिकांच्या नव्या पिढीला, पूरक स्टार्टअप्सना ‘लॅब एक सेवा म्हणून’ पुरवतील आणि त्या दरम्यान टेस्टिंग व सल्लासेवेच्या स्वरूपात मदत करतील. यामुळे वेगाने बदलत असलेल्या ऊर्जा यंत्रणा क्षेत्रात सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, ज्ञान वर्धनाला चालना मिळेल. एआय, डीप लर्निंग, बिग डेटा, ब्लॉकचेन, नेटवर्किंग आणि ऑटोमेशनच्या येण्यामुळे ऊर्जा यंत्रणा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण सुविधांची मागणी अतिशय महत्त्वाची झाली आहे. एमएसआरआयटीमधील जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स आधुनिक शिक्षण, डिझाइन, विकास आणि स्मार्ट ग्रिड किंवा परिवर्तनशील ऊर्जा यंत्रणा क्षेत्रासाठी अंमलबजावणी क्षमता पुरवेल. स्मार्ट ग्रिड ऊर्जा यंत्रणा प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करत, दरम्यान इंजिनीअर्स, पदवीधर आणि तांत्रिक कर्मचारीवर्गाला आधुनिक कौशल्ये व ज्ञान देऊन सक्षम केले जाणार आहे. त्यांच्या मदतीने एमएसआरआयटीमधील जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स कुशल मनुष्यबळचा स्तर उंचावेल आणि त्यांची निर्मिती करेल. या उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सेंटर ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक विकासाला चालना देईल. एम.एस. रामैय्या नगर, एमएसआरआयटी पोस्ट, बेंगळुरू, 560054 येथे वसलेले जेएसडब्ल्यू सेंटर ऑफ एक्सलन्स ऊर्जा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन, प्रशिक्षण आणि विकासाचे केंद्र बनून या उद्योगाचा विकास आणि प्रगतीसाठी योगदान देईल.

आरोग्य आणि नेत्रदानाच्या जनजागृतीसाठीची “रन टू रिबॉर्न” मॅरेथॉन स्पर्धा संपन्न .

पुणे - सध्याचा काळात बदलणारी जीवनशैली, अनियमित दिनचर्या, प्रदूषण आणि मानसिक ताण जास्त प्रमाणात वाढल्याने बहुतेक लोकांना आरोग्याच्या आणि डोळ्यांच्या त्रासाला सामोरा जावं लागतं. त्यामुळे निरोगी...

इनरव्हील क्लब रिव्हरसाईडच्या अध्यक्षपदी हीरा राजीव अगरवाल

पुणे : इनरव्हील क्लब रिव्हरसाईड डिस्ट्रिक्ट ३१३च्या अध्यक्षपदी हीरा राजीव अगरवाल यांची निवड झाली आहे. सचिवपदी शशी अगरवाल, खजिनदारपदी अनिता निवेतिया यांची निवड झाली...

Breaking

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री अजित...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा...
spot_imgspot_img