SHARAD LONKAR
55151 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Exclusive articles:
रेल्वे सुरक्षा दलातील उपनिरीक्षकाला 70,000 रुपयांची लाच घेताना केली अटक
मुंबई, 17 जुलै 2024
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका उपनिरीक्षकाला तक्रारदाराकडून 70,000 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
या...
रिअल इस्टेटमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी गोदरेज प्रॉपर्टीजने C.R.E.W चा पुणे अध्याय केला सुरू
● C.R.E.W, कलेक्टिव्ह ऑफ रिअल इस्टेट वुमन हा देशव्यापी उपक्रम आहे.
● आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर 670+ पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी झाली आहे.
पुणे, १७ जुलै २०२४ : भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने कलेक्टिव्ह ऑफ रिअल इस्टेट वुमन(C.R.E.W)साठी पुणे चॅप्टर सुरू केला. रिअल इस्टेट, बांधकाम आणि संबंधित क्षेत्रातील महिला व्यावसायिकांना सक्षम करणे हा या देशव्यापी उपक्रमाचा उद्देश आहे.
गोदरेज प्रॉपर्टीज नेहमीच विविधता आणि सर्वसमावेशकतेत आघाडीवर राहिली आहे, कंपनीने 31% महिला, LGBTQ, आणि PWD कर्मचाऱ्यांचे 32% प्रतिनिधित्व दाखविले आहे आणि 32% महिलांचे प्रतिनिधित्व FY24 साठी पुण्यात दिसून आले आहे.
प्रोजेक्ट वुल्फ हा कार्यक्रमाच्या प्रमुख घटकांपैकी एक अंतर्गत अभ्यास आहे, ज्यामध्ये ५००+ पेक्षा जास्त महिलांना सहभागी करून घेण्यात आले आहे, उदासीनता आणि प्रतिबद्धता डेटाचे विश्लेषण करणे आणि कार्यात्मक आणि भावनिक गरजांवर आधारित लक्ष्यित उपाय विकसित करणे, हा याचा उद्देश आहे. एका महत्त्वाच्या शोधातून असे दिसून आले आहे की, महिला कर्मचाऱ्यांच्या भावनिक गरजा कामाच्या ठिकाणी त्यांच्या कार्यात्मक आवश्यकतांपेक्षा जास्त आहेत, त्यातून एक सहायक आणि सहानुभूतीपूर्ण कामाचे वातावरण तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.
C.R.E.W ची कल्पना एक सर्वांगीण दृष्टिकोन म्हणून केली जाते, त्यात केवळ संख्या मोजली जात नाही. एक असे वातावरण तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते, जिथे महिला कार्यात्मक आणि भावनिक दोन्ही गरजा पूर्ण करून खऱ्या अर्थाने भरभराट करू शकतात. हा उपक्रम केवळ गोदरेज प्रॉपर्टीजपुरता मर्यादित नाही, तर रिअल इस्टेट क्षेत्राला लैंगिक विविधतेला प्राधान्य देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी एक राष्ट्रीय चळवळ म्हणून त्याची कल्पना आहे.
गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या सीएचआरओ मेघा गोयल म्हणाल्या, “आम्ही या क्षेत्रात केलेली कामे आणि आमचे ध्येय यामध्ये हा फोरम सुरू करण्यामागील उद्देश दडलेला आहे. आम्ही पुढील काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्व महिलांचा भरभराटीचा समूह म्हणून CREW तयार करण्यास उत्सुक आहोत, विशेषत: बांधकाम क्षेत्रात, जे खास करून महिलांसाठी सर्वात आकर्षक क्षेत्र नाही. आमच्या अंतर्गत अभ्यास 'प्रोजेक्ट वुल्फ'मधील डेटानुसार महिला प्रतिनिधित्व आणि समावेशासाठी डेटा-आधारित माहिती तयार करण्यात मदत करण्यासाठी आश्वासक आणि सहानुभूतीपूर्ण कामाचे वातावरण तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
या लाँच इव्हेंटला प्रभावशाली नेते आणि व्यावसायिक एकत्र आले. लैंगिक विविधता आणि उद्योगात समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून याकडे पाहिले पाहिजे. यात पॅनेल चर्चा, परस्परसंवादी कार्यशाळा आणि नेटवर्किंगच्या संधी होत्या. "रिअल इस्टेटमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या संधीचा शोध" या शीर्षकाच्या पॅनेल चर्चेत डॉ. सुषमा कुलकर्णी, NICMAR विद्यापीठ, पुणेच्या कुलगुरू, सुश्री गायत्री वासुदेवन, समभाव फाउंडेशनच्या मुख्य प्रभाव अधिकारी, सुश्री हेमामालिनी उपूर, नीना पर्सेप्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या सीईओ आणि सुश्री अकिला जयरामन, गोदरेज प्रॉपर्टीजच्या क्षेत्र प्रमुख यांचा समावेश होता. त्यांनी सर्वसमावेशक कार्यस्थळांना चालना देण्यासाठी, स्टिरियोटाइपला आव्हान देणारी आणि रिअल इस्टेटमधील महिलांसाठी मार्गदर्शन व लक्ष्यित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे समोर मांडली.
C.R.E.W चे उपक्रम भारताच्या अनन्यसाधारण सांस्कृतिक आणि व्यावसायिक संदर्भानुसार तयार केले गेले आहेत. जे जेंडर नॉर्म्स आणि प्रासंगिकता व परिणामकारकतेसाठी परिणामकारक आहेत. प्लॅटफॉर्म लवचिकता धोरणे, कार्य-जीवन संतुलन आणि करिअर वाढीस प्रोत्साहन देते, ज्यामुळे संस्कृतीत बदल घडवून आणण्यासाठी व कर्मचाऱ्यांना सर्व स्तरांवर गुंतवून ठेवता येते. सर्वसमावेशक कार्यक्षेत्रासाठी गोदरेज प्रॉपर्टीजची वचनबद्धता C.R.E.W ला चालना देते, ज्यामुळे सर्जनशीलता, नावीन्यता आणि व्यावसायिक कामगिरी वाढते. C.R.E.W रिअल इस्टेटमधील स्त्रियांच्या कमी प्रतिनिधित्वाला संबोधित करते, त्यांच्या प्रतिभेचा फायदा घेऊन या क्षेत्रातील वाढ आणि उत्कृष्टता आणण्यासाठी प्रत्येक जण समृद्ध होऊ शकेल, असे वातावरण तयार करते.
आणि शरद पवारांनी सगळंच सांगितलं..
पुणे-राज्यात सद्यस्थितीत ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभा आहे. या सर्व घडामोडी घडत असताना राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन...
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने केली 84,119 मुलांची सुटका
नवी दिल्ली, 17 जुलै 2024
रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) गेली सात वर्षे ‘नन्हे फरिश्ते’ अभियान प्रभावीपणे राबवत आहे. भारतीय रेल्वेच्या देशभरातील विविध विभागांमध्ये काळजी आणि...
संगीत ही माझी जीवनरेखा, त्याशिवाय मी चालू शकत नाही!’ : आयुष्मान खुराना
यंग बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाने नुकताच खुलासा केला आहे की, त्याच्या जीवनात संगीताशिवाय तो जगू शकत नाही. अभिनेत्याने आपल्या सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये,...
Breaking
बिबट्याला रोखण्यासाठी…..!!
पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...
जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा
पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...
डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा
पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...
मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन
रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद
पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले.
रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे, संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला.
जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे.
विकृत शिवचरित्रे नष्ट करा
सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले.
समारोप समारंभ
भिडे गुरुजी यांच्या...
