SHARAD LONKAR

56653 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कसब्यात लाट आहे पण … परिवर्तनाची

--------------------------------------------- कसबा विधानसभा मतदार संघात लाट आहे पण ती नरेंद्र मोदी यांची नाही तर परिवर्तनाची लाट आहे , या मतदार संघात कसबा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे...

एलबीटी मुक्त आणि टोलमुक्त महाराष्ट्राची उद्धव ठाकरे यांची घोषणा

छत्रपतींचा आशीर्वाद , चला देवू मोदींना साथ या भाजपच्या जाहिरातीची खिल्ली आज उद्धव ठाकरे यांनी उडविली … अरे दिली होती तुम्हाला साथ ,...

पुण्यात दहशतवादरुपी रावणाचे प्रतीकात्मक दहन

पुणे लोकमान्य फेस्टिव्हल तर्फे दुष्काळ व दहशतवाद रूपी रावणाचे दहन पुण्यातील नदीपात्रात करण्यात आले झेड ब्रीज येथिल नदिपात्र येथे हे दहन करण्यात आले...

सर्वांत श्रीमंत उमेदवार भाजपचा … जो आहे भोजपुरी क्रिकेट लीगचा मालक

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून मुंबईतील भाजपचे दिंडोशीचे उमेदवार मोहित कंबोज यांचे नाव काही माध्यमांनी आज पुढे आणले आहे आहे .उमेदवारी...

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर दरीत एसटी बस कोसळली -2 ठार

पुणे - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पांगोळीजवळ साता-याहून मुंबईकडे जाणारी एसटी बस पलटून झालेल्या अपघातात 2जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये सुमारे ३० ते...

Breaking

मुळा–मुठा नदीत कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार

सात दिवसांची मुदत संपली; एमआयटी एडीटी विद्यापीठासमोर कचऱ्याच्या गाड्या...

पुणे परिमंडलात ३१९ कोटींची थकबाकी;७१२२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पुणे, दि. १३ मार्च, २०२६- वारंवार पाठपुरावा करुनही वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे मार्च महिन्यात गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी आदी सणवार आहेत. तर दुसरीकडे महावितरणची मार्च एण्ड मोहीम या परिस्थितीत वीजग्राहकांनी आपले वीजबिल थकबाकीसह भरुन गुढीपाडवा गोड करावा, वाद टाळून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन पुणे परिमंडलाकडून करण्यात आले आहे. पुणे परिमंडलात ३१९ कोटी ५० लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम राबवण्यात येत असून, १ मार्चपासून ७१२२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केलेला आहे. मार्च अखेर थकबाकी शून्य करण्यासाठी महावितरणने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. वसुलीसाठी महावितरणने विभागनिहाय पथके तयार करुन थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करावा लागत आहे. त्यातून अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवत आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केल्यास पुनर्रजोडणी शुल्काचा भुर्दंड ग्राहकांना बसणार आहे.             पुणे परिमंडलात ५ लाख ५१ हजार ५९८ ग्राहकांकडे तब्बल ३१९ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. वर्गवारीनिहाय थकबाकीचा विचार केल्यास घरगुती ४,६४,३०२ ग्राहकांकडे ७४ कोटी ८१ लाख, वाणिज्यिक ६५,४०८ ग्राहकांकडे ३१ कोटी ५३ लाख, औद्योगिक १०,०९९ ग्राहक १८ कोटी ३६ लाख, दिवाबत्ती  ४,६१० ग्राहक ९६ कोटी १४ लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा १,८५८ ग्राहक ८७ कोटी ५० लाख तर सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील ५,३२१ ग्राहकांकडे ११ कोटी १३ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. ७१२२ ग्राहकांची वीज तोडली १ मार्च ते ९ मार्च २०२६ या कालावधीत ७ हजार १२२ ग्राहकांचा वीज पुरवठा आधीच खंडित करण्यात आला आहे. यामध्ये १ हजार ७२५ कायमस्वरूपी तर ५ हजार ३९७ तात्पुरत्या स्वरूपातील खंडित जोडण्यांचा समावेश आहे. शिवीगाळ व धमकावण्याचे प्रकार; महावितरणची पोलिसांत फिर्याद फायर ब्रिगेड उपविभागांतर्गत वसुलीसाठी गेलेले शाखा अभियंता अनिरुद्ध लिमकर यांना निलेश म्हेत्रे या ग्राहकाने मीटरची तपासणी करताना शिवीगाळ करत धमकावले होते. त्यामुळे लिमकर यांनी खडक पोलिस ठाण्यात तशी फिर्याद दिली. तर दुसऱ्या घटनेत कोंढवा बु. येथे वसुलीसाठी गेलेले वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश कसबे यांना तिथे उपस्थित असलेल्या अहमद मोहमद हनिफ शेख याने शिवीगाळ करुन धमकावले. या प्रकरणातही महावितरणने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वेळेत बिल भरा, सवलत मिळवा !ऑनलाईन वीजबिल भरल्यास जवळपास १ टक्का आणि तत्काळ बिल भरल्यास तत्पर देयक भरणा सूट मिळते. याउलट, बिल भरण्यास विलंब केल्यास दंड लागतो. त्यामुळे ग्राहकांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मुदतीपूर्वी बिलाचा भरणा ऑनलाईन करणे फायदेशीर ठरते. महावितरण मोबाईल ॲप, www.mahadiscom.in संकेतस्थळ, फोन पे, गुगल पे, भीम आदी युपीआय ॲपचा वापर करुनही वीजबिल घरबसल्या भरता येते. वीजग्राहकांनी गैरसोय टाळावी- सुनिल काकडेग्राहकांनी चालू वीज देयकासह थकबाकीचा त्वरित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे. वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रसंग टाळावा. तसेच वीजबिल भरण्यासाठी डिजिटल पेमेंटचा वापर करावा असे आवाहन महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.

सर्वधर्म समभावाचा संदेश देत येरवडा येथे इफ्तार पार्टी; वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे— पवित्र रमजान महिन्यानिमित्त येरवडा येथील शहादल बाबा दर्गा...
spot_imgspot_img