![पुणे - अफगाणिस्थान मैत्रीचे नवे पर्व चालू , असीम फॉउंडेशन तर्फे अफगाणिस्थान मधील विधार्थिनीना मिळणार माहिती -तंत्रज्ञानाचे धडे](http://mymarathi.net/wp-content/uploads/2016/07/rsz_1logo-for-portal-300x217.jpg)
पुणे – अफगाणिस्थान मैत्रीचे नवे पर्व चालू , असीम फॉउंडेशन तर्फे अफगाणिस्थान मधील विधार्थिनीना मिळणार माहिती -तंत्रज्ञानाचे धडे
पुणे :
असीम फॉउंडेशन व डिजिटल सिटीझन फंड यांच्या संयुक्त विद्यमाने अफगाणिस्थान मधील युवतींना IT चे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोया मेहबूब, या अफगाणिस्थानस्थित जगातील प्रथम १०० इंन्स्पायरिंग व्यक्तींपैकी एक असून त्यांच्या पुढाकाराने व सारंग गोसावी , असीम चे संस्थापक यांची संकल्पना असलेल्या या उपक्रमाला दिनांक ६ सप्टेंबर रोजी प्रारंभ होत आहे.
६ महिने चालणाऱ्या या कोर्स मध्ये, संगणक क्षेत्रातील वेगवेगळ्या संधीची माहिती करून देतानाच , “वेब डेव्हलपमेन्ट ” चे प्रशिक्षण देखील या युवतींना दिले जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पहिले ४ महिने सत्र होतील व या कोर्स ची शेवट हि या महिलांच्या भारत दौऱ्याने होणार आहे असे असीम चे संस्थापक अध्यक्ष सारंग गोसावी यांनी सांगितले.
प्रशिक्षणाबरोबर या युवतींना “इ -मेंटॉर ” व “इ -फ्रेंड ” दिले जातील. यातून एकात्म विचार व सांस्कृतिक देवाणघेवाण देखील साधता येईल. ह्या नवीन प्रयोगाची सुरवात करतांना फेब्रुवारी महिन्यातील दौऱ्या मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेमार्फत केले गेले आहे.